Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Akola Crime : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयानं हा निकाल दिलाय. एडीच एकर शेतीच्या वादातून चौघांची हत्या करण्यात आली होती.
Akola Crime News
Akola Crime NewsSaam Digital

अक्षय गवळी

अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट न्यायालयानं हा निकाल दिलाय. एडीच एकर शेतीच्या वादातून बहिणीनेचं पतीच्या आणि पोटच्या दोन मुलाच्या मदतीनं सख्या दोघां भावांसह त्यांच्या 2 मुलांना असे एकत्रित चौघांना संपवलं होतं. दरम्यान या प्रकरणात हरिभाऊ राजाराम तेलगोटे, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयानं दोषी ठवरत मृत्यु दंडाची शिक्षा सुनवाली आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून बाल न्यायालयात त्याचं प्रकरण सुरू आहे. २०१५ मध्ये बाबुराव सुखदेव चऱ्हाटे (वय 60, नोकरी शिक्षक) आणि धनराज सुखदेव चऱ्हाटे (वय 50. वर्ष), गौरव धनराज चाऱ्हाटे (वय 19), शुभम धनराज चाऱ्हाटे (वय 17) या चौघांची हत्या करण्यात आली होती.

मृत धनराज आणि बाबुराव यांची सख्खी बहीण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि पोटच्या 2 मुलांच्या मदतीने शेतीच्या वादातून 28 जून 2015 रोजी धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेत जमिनीच्या वादातून हे ह्त्याकांड घडलं होतं.

Akola Crime News
Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

सर्व आरोपींवर कलम ३०२, ५०६ सहकलम ३४ भादंवि नुसार शिक्षा सुनावण्यात आली. भादंवि ३०२ सकलम ३४ या कलमाअंतर्गत तीनही आरोपी हरिभाऊ, द्वारकाबाई आणि शामला फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये रकमेच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Akola Crime News
Beed News : एक कोटींची रोकड, सोन्याचे बिस्किटे, दागिने; बीडमध्ये पोलिसाच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com