नवी दिल्ली : दिल्ली येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या रोहिणी या भागात एका ३ वर्षीय चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. २५ वर्षीय आरोपीने चिमुरड्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या रोहिणी जिल्ह्यातील बेगमपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. पीडित चिमुकली तिच्या आईसोबत झोपली होती. अचानक आईची झोप उडाली. त्यानंतर महिलेला चिमुकली जवळ नसल्याचे तिला आढळून आली. आजूबाजूला शोधल्यानंतरही चिमुकली महिलेला सापडली नाही. त्यानंतर महिलेने तातडीने पोलिसांना सूचना दिली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना शोधल्यानंतर पीडित चिमुकली एका झाडाजवळ आढळली. यावेळी एका तरुण देखील घटनास्थळी होता. या तरुणाने पीडित मुलीच्या आईला पाहून पळ काढला. त्यानंतर बेगमपूर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला.
दरम्यान, रोहिणीमध्येही ऑगस्ट महिन्यात अत्याचाराची घटना घडली होती. एका मांत्रिकाने एका ७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. तुझ्या आजारी वडिलांचा मृत्यू होईल, अशी भीती घालून मांत्रिकाने मुलीवर अत्याचार केला. मांत्रिकाने मुलीला ५१ रुपये देखील दिले. या प्रकरणाचा तक्रार पोलिसांत नोंद होताच आरोपी मांत्रिकाला अटक करण्यात आली. हा मांत्रिक स्मशानभूमीजवळच राहायचा. २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. पीडित मुलीच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर वडील आजारी आहेत. यामुळे मांत्रिक त्याला पाहायला आला होता.
या मांत्रिकाने मुलीच्या वडिलांना सांगितलं की, तुमच्या मुलीला झाडणीसाठी पाठवून द्या. त्यानंतर वडिलांनी तिला मांत्रिकाकडे पाठवलं आहे. त्यावेळी मांत्रिकाने पीडित मुलीवर अत्याचार केला. घरी परतल्यानंतर मुलगी शांत झाली होती. दुसऱ्या दिवशी तिची तब्येत बिघडली. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्या अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एफआयआर नोंदवून मांत्रिकाला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.