Dombivli News: धक्कादायक! स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास वडिलांचा विरोध; १६ वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Shocking News: सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक धक्कादायक घटना घडत असतात. त्यातच डोंबिवलीमधून अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे एका अल्पवयीन मुलीने सोशल मीडियाच्या नादात स्वत:ते जीवन संपवले आहे.
Shocking News
Dombivli NewsShocking News
Published On

आजच्या तरुण पिढीच्या तरुणांपासून ते मोठ्या व्यक्तींना असे सर्वजणांना सोशल मीडियाचे प्रचंड वेड लागले आहे. याच सोशल मीडियाच्या वेडापायी काहीजण अनेकदा टोकाची पाऊले उचलताना आपण पाहिलं असेल. सध्या असाच एक प्रकार डोंबिवलीमधून समोर आला आहे. वडिलांनी आपल्याच मुलीला सोशल मीडियाच्या अति वापरावरुन ओरडल्याने एका अल्पवयीन मुलीने स्वत:चे आयुष्यच संपवलं. या धक्कादायक घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

Shocking News
Pakistan Shocking News: अल्पवयीन मुलीचं तब्बल ७२ वर्षीय वृद्धासोबत लग्न;पाकिस्तानमधील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलवर स्नॅपचॅट अ‍ॅल्पिकेशन सुरू करु असे वडिलांनी मुलीला सांगितल्याने डोंबिवलीत(Dombivli) वास्तव्यास असणाऱ्या १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. अल्पवयीन मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली. संपूर्ण धक्कायदायक घटना ही ता.२१ शुक्रवारी रात्री दरम्यान घडली. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमके काय घडले?

शुक्रवारी रात्री अल्वयीन मुलीच्या वडिलांनी मुलीला स्नॅपचॅट अ‍ॅप(App) मोबाईमध्ये डाऊनलोड करु नको असे सांगितले. मात्र तरीही मुलीने ते मोबाईलमध्ये डाऊनलोड केले ते वडिलांना समजताच वडिलांनी त्यावर नाराजी दर्शवली आणि तिला पुन्हा असे करु नये असे सांगितले. त्यानंतर ती नाराज होऊन तिच्या बेडरुमध्ये गेली. दुसऱ्या दिवशी वडिल तिच्या बेडरुममध्ये गेले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

मुलीला त्या अवस्थेत पाहून कुटुंबियाना मोठा धक्का लागला त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सध्या या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Shocking News
Mumbai Shocking News: खळबळजनक! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये आढळलं माणसाचं कापलेलं बोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com