GPay App News : GPay आजपासून बंद; ऑनलाइन पेमेंटसाठी US मध्ये गुगलचं कोणतं अ‍ॅप वापरायचं?

GPay App News : गुगल पे अ‍ॅप प्लेस्टोअरवरून देखील हटवण्यात आलं आहे. GPay आजपासून यूएसमध्ये बंद झालं आहे. यूएसमध्ये P2P पेमेंट डिस्कंटीन्यू झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
GPay App News
GPay App News Saam TV

गुगलने ऑनलाइन पेमेंट गुगल पे अ‍ॅप आजपासून बंद केलं आहे. तसेच गुगल पे अ‍ॅप प्लेस्टोअरवरून देखील हटवण्यात आलं आहे. GPay आजपासून यूएसमध्ये बंद झालं आहे. यूएसमध्ये P2P पेमेंट डिस्कंटीन्यू झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

GPay App News
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यासोबतच मिळणार प्रमोशन, सरकारची मोठी घोषणा

४ जूनपासून सर्विस बंद

अमेरिकामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे गुगल पे अ‍ॅप ४ जून पासूनच बंद झाले आहे. अ‍ॅप बंद झाल्यानंतर येथील व्यक्तींनी हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर शोधले. मात्र त्यांना तेथेही हे अ‍ॅप दिसले नाही.

गुगलने हा निर्णय नेमका का घेतला?

गुगलकडून यूजर्ससाठी आणखी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. गुगल विविध योजनांवर काम करत आहे. गुगल यूजर्सनां गूगल वॉलेट आणि मोबाइल पेमेंट सर्विस देखील पुरवत आहे. त्यामुळे यूजर्सने याचाही वापर केला पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातही लॉन्च झालं गुगल वॉलेट अ‍ॅप

भारतात देखील गुगल वॉलेट अ‍ॅप गेल्या काही दिवसांपूर्वीच लॉन्च करण्यात आलं आहे. हे अ‍ॅप गुगल पे पेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने चालतं. भारतात अद्याप याचा वापर करण्यास सुरुवात झालेली नाही. गुगल वॉलेट काही ठरावीक कामांसाठी आहे. याच्या सहाय्याने फोनमध्ये काही इवेंट आणि तिकिट बुकींगची कामे केली जाऊ शकतात.

GPay App News
Mobile Recharge: Google Pay वरुन रिचार्ज करताय? मोजावे लागतील अधिक पैसे, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com