Warren Buffett On Banking Crisis : बँकिंग क्षेत्रावरचं संकट दूर झालंय असं जर आम्हा-तुम्हाला वाटत असेल तर, नक्कीच नाही. कारण जगभरातील श्रीमंतांपैकी एक असलेले अब्जाधीश आणि आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी बँक संकटाबद्दल भीतीदायक अंदाज व्यक्त केला आहे.
आगामी काळात आणखी काही बँका (Bank) बुडण्याची शक्यता आहे, असे वॉरन बफे म्हणाले. सीएनबीसीसोबत चर्चा करताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. ठेवीदारांनी चिंता करण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितले.
मागील महिन्यात अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक बुडाल्याचे वृत्त होते. अमेरिकेच्या इतिहासात या घटना सर्वात मोठ्या मानल्या जात आहेत. अमेरिकेतील बँक संकटांनी संपूर्ण जग हादरून गेलं आहे.
आणखी काही बँका बुडण्यापासून वाचण्यासाठी अमेरिकी सरकारला मोठे पाऊल उचलावे लागले आहे. बुडणाऱ्या बँकांमध्ये असलेल्या पैशांची जबाबदारी सरकारने घेतली. तसेच या संकटातून सावरण्यासाठी बँकांना अतिरिक्त निधीची सुविधाही उपलब्ध करून दिली. (Latest Marathi News)
बफे म्हणाले की, 'बँकेत जमा पैसे बुडतील अशी भीती ठेवीदारांनी बाळगू नये. संपूर्ण ठेवींच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा उपलब्ध असल्याने तशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही.'
बँकिंग क्षेत्रावरील संकट अद्याप संपलं नसलं तरी, ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. अमेरिकी बँकांमध्ये जमा केलेले पैसे बुडणार नाहीत. तसे होणारच नाही. व्यवस्थापकांकडून पैशांबाबत जी भीतीदायक माहिती दिली जाते, त्यावर भरवसा ठेवण्याची गरज नाही, असेही बफे म्हणाले.
बँकांनी ग्राहकांचा विश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे. मागील महिन्यात ज्या घटना घडल्या, त्यामुळे काही सेकंदातच बँका लोकांचा विश्वास गमावू शकतात, असे बफे म्हणाले. दरम्यान, संकटकाळात बँकांना मदत करण्यात बफे आघाडीवर असतात.
२००८ साली बँकिंग क्षेत्रावर संकट कोसळले होते. त्यावेळी लेहमन ब्रदर्स दिवाळखोरीत निघाल्यावर त्यांनी ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. २०११ मध्ये संकटात सापडलेल्या बँक ऑफ अमेरिकामध्ये ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यामुळे बँकांवर लोकांचा विश्वास वाढण्यास मदत झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.