Esakal No.1: मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये गाठले पहिल्या क्रमांकाचे स्थान 

Digital Journalism: डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवत मराठी न्यूज वेबसाइटमध्ये वर्चस्व कायम ठेवले आहे. डिसेंबरमध्ये 19.5 मिलियन युजर्सनी भेट देत या पोर्टलवरील विश्वास अधिक दृढ केला.
E-Sakal No.1
E-Sakal No.1Sakal
Published On

सध्या लोक डिजीटल युगात वावरत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी मराठी डिजिटल पत्रकारितेत जोमाने काम करायला सुरुवात केली. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही त्यांनी पहिलं स्थान पटकावत मोठे यश मिळवले आहे. वाचकांपर्यंत विश्वासाने आणि अचूक माहिती पोहोचवण्याच्या प्रयत्नांमुळे मराठी वेबसाइट्समध्ये ई-सकाळने अव्वल स्थान पटकावलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाचकांच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या पोर्टलला डिजिटल क्षेत्रातही मोठा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळत आहे.

ई-सकाळ वेबसाइटवर नेहमीच वाचकांच्या हिताच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख आणि विविध विषयांवरील अपडेट्स देत असतं. गेल्या २५ वर्षांपासून या वेबसाइटने सातत्याने चांगली कामगिरी केली असून वाचकांचा विश्वास कायम राखण्यात ती यशस्वी ठरली आहे. याच विश्वासाच्या जोरावर वाचकांनी ई-सकाळला मराठी डिजिटल माध्यमांमध्ये नंबर एक स्थान मिळवून दिलं आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात ई-सकाळ वेबसाइटला तब्बल १९.५ मिलियन युजर्सनी भेट दिली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही या पोर्टलसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरलेली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार ई-सकाळने तब्बल ७.३ कोटी युजर्स टप्पा पार केला आहे.

E-Sakal No.1
WhatsApp New Feature: भन्नाटच! WhatsApp चॅटिंगमध्ये आणखी एक भन्नाट पर्याय, समोरच्याला एका क्षणात करा इम्प्रेस

अचूक, वेगवान आणि तथ्यांची पडताळणी करून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे वाचकांचा विश्वास जास्त दृढ झाला आहे. स्थानिक स्तरापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींना व्यापक कव्हरेज देण्यासोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेला मल्टिमीडिया कंटेंटही वाचकांना आकर्षित करत आहे. वेब स्टोरीज, व्हिडिओ न्यूज, फोटो गॅलरी आणि स्पष्टीकरणात्मक लेख अशा विविध फॉरमॅट्समुळे वाचकांना अधिक समृद्ध आणि आकर्षक अनुभव मिळत आहे.

डिजिटल पत्रकारितेतील वाढत्या स्पर्धेमध्येही गुणवत्तापूर्ण पत्रकारितेच्या जोरावर ई-सकाळने आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. मोबाईल-फर्स्ट धोरणामुळे तरुण वाचकही मोठ्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मशी जोडले जात आहेत. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय उपस्थिती, ताज्या घडामोडींचे जलद अपडेट्स आणि विश्वासार्ह पत्रकारिता ही या यशामागील महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. कॉमस्कोरच्या रँकिंगमुळे मराठी डिजिटल पत्रकारितेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

E-Sakal No.1
Blood Pressure Medicine Timing: BP ची औषधं सकाळी घ्यावीत की रात्री? डॉक्टरांनी सांगितली योग्य वेळ अन् महत्त्वाचं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com