HSRP Number Plate: महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट नाही? आजपासून थेट ₹1,000 दंड; सरकारचा इशारा

Maharashtra RTO: 30 जूननंतर HSRP नंबर प्लेटसाठी कोणतीही मुदतवाढ मिळालेली नाही. HSRP नसलेल्या वाहनांवर किमान १००० दंड आकारला जाणार असून वाहन हस्तांतरण, पुननोंदणी आणि इतर RTO सेवांवरही परिणाम होणार आहे.
HSRP Number Plate
HSRP Number Plategoogle
Published On

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट मुदत संपल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे.1 एप्रिल 2019 च्या अगोदरच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सोलापुरात 1 एप्रिल 2019 ची तब्बल 9 लाख वाहने आहेत,त्यापैकी फक्त 2 लाख सत्तर हजार वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. सोलापुरातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी अधिकृत रित्या माहिती देताना सांगितलं, तब्बल पाच वेळा HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

30 जून 2026 नंतर मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा अनेक वाहनधारकांना होती, मात्र राज्य शासनाने मुदतवाढ दिली नाही. HSRP नंबर प्लेट नसेल तर वाहन संबंधी सर्व काम रखडणार,त्याची खरेदी विक्री होणार नाही,तसेच इतर कामे केली जाणार नाहीत.परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गस्ती पथकामार्फत HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना कमीतकमी 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

HSRP Number Plate
Blood Pressure : औषधांशिवायही BP नियंत्रणात राहू शकतो! हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले ७ सोपे उपाय

HSRP नंबर प्लेट बसविण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे वाहनांबाबत कोणताही गैरप्रकार होणार नाही.हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असल्याने चोरीचे वाहन ताबडतोब पोलिसांच्या नजरेस येईल. तसेच फॅन्सी नंबर प्लेट मुळे अनेक अपघात ग्रस्त वाहनांची ओळख पटविणे अवघड जाते.मात्र वाहनाला HSRP नंबर प्लेट असेल तर अपघातस्थळी ओळख होईल आणि तत्काळ मदत मिळण्यात सोपे होईल.

HSRP नंबर प्लेट बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण,पत्ता बदल,कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे,वाहनाची पुनर्नोंदणी,वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा तत्काळ उपलब्ध होतील.

HSRP Number Plate
Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com