

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून सुरैया देसाई पहिल्या
घर, संसार आणि मुलाचा सांभाळ करत दिली स्पर्धा परीक्षा
रणजित माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी
अनेकदा आपल्याला हव्या तशा गोष्टी होत नाही. अनेक जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्यांमुळे अनेक स्वप्न मागे पडतात. परंतु या जबाबदाऱ्या सांभाळतदेखील तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करु शकतात. स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. याचंच एक उदाहरण म्हणजे सुरैया देसाई. त्यांनी घर, संसार सांभाळत स्पर्धा परीक्षा दिली.
विक्रिकर सहायक पदाला गवसणी
घर, संसार आणि स्पर्धा परीक्षा… या तिन्ही गोष्टी यशस्वीकरित्या सांभाळत कागल तालुक्यातील बेनिक्रे गावच्या सुरैया साहेबलाल देसाई यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विक्रीकर सहाय्यक पद मिळवत आर्थिक दुर्बल घटक महिलांमधून त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बेनिक्रे गावातील सुरैया देसाई यांचा हा प्रवास खडतर पण प्रेरणादायी ठरला आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा अपयश आलं. पण प्रत्येक वेळी त्यांनी नव्या जिद्दीने उभं राहत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.
सुरैया यांनी बी.टेक.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा विवाह कारदगा येथील नयीम पटेल यांच्याशी झाला. संसाराची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. दरम्यान, मुलाच्या आजारपणामुळे अभ्यासात अडथळे आले, अगदी एकदा संधीही थोडक्यात हुकली. मात्र, आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी पुन्हा उभारी घेतली.
सातत्य, जिद्द अन् कठीण परिश्रम
सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अखेर त्यांनी यशाला गवसणी घातली. विक्रीकर सहाय्यक पद मिळवत आर्थिक दुर्बल घटक महिलांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. सुरैया देसाई यांच्या या यशामुळे बेनिक्रे गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.