Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल; आधी IPS मग IAS; कोणत्याही कोचिंगशिवाय दोनदा UPSC क्रॅक; कोमल पुनिया यांचा प्रवास

Success Story of IAS Komal Punia: आयएएस कोमल पुनिया यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. ते पहिल्यांदा आयपीएस अधिकारी झाले त्यानंतर आयएएस अधिकारी झाले.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

IAS कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

एकदा नव्हे दोनदा UPSC क्रॅक

शेतकऱ्याची लेक झाली IAS

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. दरवर्षी लाखो लोक यूपीएससी परीक्षा देतात. जर तुम्ही खूप मेहनत घेतली तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असं म्हणतात. त्यामुळे नेहमी आपले प्रयत्न सुरु ठेवायचे. असंच काहीसं कोमल पुनिया यांनी केलं. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS कोमल पुनिया

IAS कोमल पुनिया या मूळच्या उत्तर प्रदेशमधील सहारनपुरच्या रहिवासी आहे. कोमल यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी २०१६ मध्ये बारावीची परीक्षा दिली. त्यांनी शाळेत टॉप केले होते.

कोमल यांनी IIT रुडकी येथून फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी बीटेक पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

कोमल यांचे लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच त्यांनी ग्रॅज्युएशननंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. त्यांनी सलग तीन वेळा परीक्षा दिली. यातील दोन वेळ त्यांनी यश मिळवले.

कोमल यांन २०२३ मध्ये दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना ४७४ रँक मिळाली. यानंतर त्यांची निवड आयपीएस अधिकारी म्हणून झाली. परंतु कोमल यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. यावेळी ट्रेनिंगदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Success Story
Success Story: खामगावच्या लेकीची कमाल! कठीण परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षा पास; CRPF पदावर निवड

कोमल यांनी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळ त्यांना ६वी रँक प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांच्या या यशामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांसाठी ही खूप मोठी प्रेरणा आहे.

Success Story
Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com