Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

RRB NTPC RECRUITMENT 2025: रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) कडून एनटीपीसीसाठी तब्बल ५८१० पदांवर मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२५ आहे. स्टेशन मास्टर, क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट अशा अनेक पदांसाठी अर्ज करा rrbapply.gov.in वर.
railway jobs information
railway jobs Saam tv
Published On

RRB NTPC New Vacancy 2025 : अनेकांचं सरकारी नोकरीचं स्वप्न असते. त्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत असतात. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये तब्बल ५८०० पेक्षा जास्त जागांवर भरती काढली आहे. आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बक्कळ पगाराच्या नोकरीसाठी फक्त पदवी असणं गरजेचं आहे. पाहूयात रेल्वेने काढलेल्या या भरतीसाठी पात्रता काय आहेत? अर्ज कसा करता येईल?

रेल्वे भर्ती बोर्डाकडून (RRB) एनटीपीसीसाठी सविस्तर जाहीर जारी करण्यात आले आहे. २१ ऑक्टोबरपासून भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सहा हजारांच्या आसपास जागेवर रेल्वेने भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख (last date for railway recruitment 2025) २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत असेल. www.rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज करता येईल. स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ट्रॅफिक असिस्टेंट, चीफ कमर्शियल, टिकट सुपरवायजर, सीनियर क्लर्क, टाइपिस्ट यासारख्या एकूण ५८१० जागांवर भरती निघाली आहे.नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानले जातेय.

railway jobs information
Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

योग्यता नेमकी काय आहे ? RRB 5810 posts eligibility criteria

अर्जदार उमेदवाराची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्जदराचे वय हे १८ वर्षे ते ३३ वर्ष यादरम्यान हवे. ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांठी वयाची अट सरकारी नियमांनुसार असेल.

railway jobs information
Vashi Fire : दिवाळीत संसाराची राखरांगोळी, वाशीतील आगीत ४ जणांचा मृत्यू

अर्ज कसा कराल ? how to apply for RRB NTPC 2025 online

  • www.rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

  • संकेतस्थळावर तुमचं नोंदणी आधीच असेल तर लॉग इन करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करा.

  • जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर New Registration वर क्लिक करून ईमेल, मोबाईल क्रमांक अन् इतर माहिती भरून नोंदणी करावी.

  • अर्ज भरण्यास सुरूवात केल्यानंतर पहिल्या टप्प्यात तुमची खासगी माहिती द्यावी. शिक्षणासह इतर माहिती भरावी लागेल.

  • त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी अर्ज करत आहात, त्याबाबत माहिती भरावी.

  • भाषा निवडाणी, फोटो अपलोड करावा.. सही स्कॅन करून अपलोड करावी.. त्यासाठी संकेतस्थळार सांगितलेली साइज किती आहे... हे पाहावे. शेवटी परीक्षेसाठीचे शुल्क भरावे अन् सबमिटवर क्लिक करावे.

railway jobs information
BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

शुल्क किती असेल ? RRB NTPC notification pdf download

एससी/एसटी/माजी लष्कर, पीडबल्यूबीडी, महिला, ट्रांसजेंडर, मायनोरिटीज अथवा ईबीसी वर्गातील उमेदवाराला २५० रूपये फी असेल. तर वर्गाला ५०० रूपये शुल्क असेल. स्टेज I क्लियर झाल्यानंतर आरक्षित वर्गातील उमेदवाराला २५० आणि अन्य वर्गातील उमेदवाराला ४०० रूपये रिफंड केले जातील.

railway jobs information
Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com