Success Story: खामगावच्या लेकीची कमाल! कठीण परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षा पास; CRPF पदावर निवड

Success Story of Khamgaon Nikita Sunil Dilip Avsarmol Selected in CRPF: खामगावच्या निकिता सुनीता दिलीप अवसरमोल हिची सीआरपीएफ पदी निवड झाली आहे. तिने SSC GD परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

खामगवाच्या लेकीची सीआरपीएफ पदी निवड

SSC GD परीक्षा उत्तीर्ण करुन मिळवले यश

निकिता सुनीता दिलीप अवसरमोलचा प्रेरणादायी प्रवास

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

खामगाव शहरातील बाळापूर फैल भागात राहणारी निकिता सुनीता दिलीप अवसरमोल हिने अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत SSC GD परीक्षा उत्तीर्ण करून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे खामगाव शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वाजत-गाजत मिरवणूक काढत तिच्या यशाचा जल्लोष केला.

Success Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, लंडनमधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS आशिष तिवारी यांचा प्रवास

निकिताचे कुटुंब सर्वसामान्य परिस्थितीत जीवन जगत असताना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचा प्रवास तिने जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर पूर्ण केला. आर्थिक अडचणी, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडथळे असतानाही तिने आपले ध्येय कधीही डोळ्याआड होऊ दिले नाही. नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने SSC GD सारख्या कठीण परीक्षेत यश संपादन केले.

निकिताच्या निवडीची बातमी समजताच खामगाव शहरात आनंदाची लाट उसळली. परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि युवकांनी एकत्र येत तिच्या घरापासून शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.

“भारत माता की जय”, “निकिता ताईंचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फुलांचा वर्षाव, मिठाई वाटप आणि जल्लोषात तिच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.

निकिताच्या घरी शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक आणि महिलांनी प्रत्यक्ष भेट देऊन तिचे अभिनंदन केले. सोशल मीडियावरही तिच्या यशाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून ती आज अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील मुलींसाठी निकिताची यशोगाथा आशेचा किरण ठरत आहे.

आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना निकिताने सांगितले की, “परिस्थिती कठीण होती, पण कुटुंबाचा आधार, आई-वडिलांचे कष्ट आणि स्वतःवर असलेला विश्वास यामुळे हे यश मिळू शकले. मेहनत आणि संयम ठेवला तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.” तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले.

Success Story
Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

निकिताची CRPF मध्ये झालेली निवड ही केवळ वैयक्तिक नसून, ती खामगाव शहराच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा ठरली आहे. तिच्या या यशामुळे अनेक युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची नवी प्रेरणा मिळाली असून “मेहनतीला पर्याय नाही” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.

Success Story
Success Story: वडील भांडी विकायचे, लेकीने नोकरी करत केली UPSC पास; IAS नमामि बन्सल यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com