Success Story: गरिबीशी दोन हात करत 'तिने' करून दाखवलं; मोमोज विकणारी आता होणार डॉक्टर, वाचा

Success Story of Beauty Jha Crack NEET: बिहारच्या ब्युटी झा यांनी २०२३ मध्ये नीट परीक्षा पास केली आहे. दिवसा अभ्यास आणि रात्री मोमोजचा स्टॉल चालवत त्यांनी परीक्षा दिली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

ब्युटी झा यांनी क्रॅक केली नीट

२०२८ मध्ये होणार डॉक्टर

दिवसा अभ्यास अन् रात्री मोमजचा स्टॉल चालवायच्या

परिस्थिती ही नेहमी आपल्या बाजूने नसते. अनेकदा आपल्याला जे हवं त्याच्या उलटं होतं. परंतु यामुळे कधीच खचून जायचं नाही, उलट या परिस्थितीला कसं बदलता येईल त्यादृष्टीने प्रयत्न करायचे असतात. असंच काहीसं ब्युटी झा यांनी केलं. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही यावर मात करायचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी दिवसा अभ्यास आणि रात्री मोमोजचा स्टॉल लावत परिस्थितीवर मात केली.

Success Story
Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

डॉक्टर होण्याचे स्वप्न

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील ब्यूटी झा या मेडिकलचा अभ्यास करत आहेत. त्यांनी नीट परीक्षा पास केली. त्या २०२८ मध्ये डॉक्टर बनतील.

ब्युटी झा यांचे आयुष्य खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यांचे वडील बिहारवरुन दिल्लीला आले. वडील एका लहान फॅक्टरीमध्ये काम करायचे. २०२० मध्ये त्यांच्या वडिलांची अचानक नोकरी गेली. त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. अशा परिस्थितीत लेकीने संपूर्ण कुटुंबाला साथ दिली.

Success Story
Success Story: IIT मधून इंजिनिरिंग, नंतर MBA; युट्यूबवरुन अभ्यास केला, ४ वर्षात तीनदा UPSC क्रॅक; IAS रोमा श्रीवास्तव यांचा प्रवास

दिवसा अभ्यास आणि रात्री मोमोजचा स्टॉल

ब्युटी यांनी दिल्लीत स्वतः चा मोमोजचा स्टॉल सुरु केला. त्या दिवसभर अभ्यास करायच्या आणि रात्री मोमोजच्या स्टॉलवर जाऊन काम करायच्या. मोमोजच्या स्टॉलवर वेळ मिळायचा तेव्हाही त्या अभ्यास करायच्या. त्यांनी अशा परिस्थितीतदेखील अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

ब्युटी यांनी ऑनलाइन क्लासेस आणि युट्यूबद्वारे नीट परीक्षेची तयारी केली. त्यांनी संपूर्ण जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी २०२३ मध्ये नीट परीक्षा पास केली. त्यांनी आता लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले आहे.

Success Story
Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल; आधी IPS मग IAS; कोणत्याही कोचिंगशिवाय दोनदा UPSC क्रॅक; कोमल पुनिया यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com