

Summary -
नांदेडमध्ये २८०० मतदार ओळखपत्रांवर क्लासेस आणि कॉलेजचे पत्ते आढळले
मनसेने मतदारयादीतील हा घोटाळा उघड केला
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चुकीच्या पत्त्यावर मतदार कार्ड देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली
मतदार वाढवण्यासाठी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने अजब कारभार केल्याचा प्रकार समोर आला आहे. चक्क २८०० मतदार ओळखपत्राचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा आहे. काच प्रभागातील मतदारयादीत हा धक्कादायक प्रकार आढळला. नांदेड शहरात पश्चिम बंगाल राज्यातील देखील मतदार असल्याचा प्रकार घडला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार प्रारूप यादी जाहीर झाली. या यादीमध्ये धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल २८०० मतदार ओळखपत्राचा पत्ता हा खासगी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा असल्याची माहिती समोर आली. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक ५ ची प्रारूप मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार दिसून आला. जवळपास एक हजार विद्यार्थ्यांच्या मतदार ओळखपत्रावर IIB कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर जवळपास ६०० ओळखपत्रावर RCC कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. तर ४०० मतदार ओळखपत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे.
अशाप्रकारे एकूण २८०० मतदार ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता असल्याचे उघडकीस आले. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अशाप्रकारे नोंदणी करण्यात आली. शेकडो ओळख पत्रात पत्ता, घर क्रमांक नाही. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना त्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. याबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. तर नांदेड शहरात पश्चिमबंगाल येथील नागरिकांचे मतदार यादीत नावे असल्याचा प्रकार देखील शिवसेनेचे शहर प्रमुख तुळजेश यादव यांनी उघड केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.