Success Story: IIT मधून इंजिनिरिंग, नंतर MBA; युट्यूबवरुन अभ्यास केला, ४ वर्षात तीनदा UPSC क्रॅक; IAS रोमा श्रीवास्तव यांचा प्रवास

Success Story of IAS Roma Srivastav: आयएएस रोमा श्रीवास्तव यांनी तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली. युट्यूबवरुन अभ्यास करुन खूप मेहनतीने त्यांनी हे यश मिळवले आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS रोमा श्रीवास्तव यांचा प्रेरणादायी प्रवास

चार वर्षात तीन वेळा UPSC क्रॅक

कोणत्याही कोचिंगशिवाय युट्यूबवरुन परीक्षा क्रॅक

आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयएएस होण्यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. यूपीएससी परीक्षेसाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यावर मात करता यायला हवी. असंच काहीसं रोमा श्रीवास्तव यांनी केलं. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी यूट्यूबचा वापर केला. युट्यूबवरुन त्यांनी अभ्यास केला. युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

युट्यूबवरुन केला अभ्यास

रोमा श्रीवास्तव यांनी युट्यूबवरुन अभ्यास केला. संकल्पना समजून घेतल्या. त्यांनी चार वर्षात तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली. २०१९ मध्ये त्यांनी ७०वी रँक प्राप्त केली. त्यांची इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्याची जिद्द या प्रवासातून दिसून येते.

NIT मधून बीटेक आणि IIM मधून एमबीए

रोमा श्रीवास्तव या मूळच्या झारखंडच्या रहिवासी आहेत.त्यांनी १२वीनंतर NIT रायपुरमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमधून बीटेक केले. त्यांनी यानंतर CAT परीक्षेची तयारी केली. यानंतर त्यांनी IIM इंदौर येथून एमबीए केले. त्यांनी मार्केटिंगमधून एमबीए केले.

रोमा यांनी कोल इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. यासाठी त्यांनी कोणतेही कोचिंग क्लासेस लावले नाही. त्यांनी यूट्यूबद्वारे यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.

Success Story
Success Story: आधी इंजिनियरिंग; १२ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् UPSC दिली; IPS सईम रजा यांचा प्रवास

तीन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक

रोमा यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना यावेळी अपयश मिळाले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांचे सिलेक्शन इंडियन पोस्ट अँड टेलीकॉम सर्व्हिसमध्ये झाले. परंतु त्यांचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांची निवड आयपीएस म्हणून झाली.

आयपीएस झाल्यानंतरही त्यांची आयएएस होण्याची इच्छा होती. त्यांनी २०१९ मध्ये ७०वी रँक मिळवली. त्यांची निवड आयएएस अधिकारी म्हणून झाली.

Success Story
Shani Mantras For Success In Job: नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवीये? शनिदेवाच्या 'या' मंत्राचा करा जप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com