Stock Market Prediction : अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजाराची पडझड, भारतावर काय परिणाम होणार?

Stock Market Prediction update : अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजाराची पडझड पाहायला मिळाली. या पडझडीचा भारतावर काय परिणाम होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजाराची पडझड, भारतावर काय परिणाम होणार?
Stock Market PredictionSaam tv
Published On

नवी दिल्ली : ग्लोबल मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनाविषयी धोरणाची घोषणा होण्याआधी गुरुवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचे संकेत मिळाले आहेत. आज सकाळी गिफ्ट निफ्टी २४,१७५ अंकावर व्यवहार करत आहे. निफ्टी फ्युचर्स कालच्या बंदच्या तुलनेत सुमारे २०० अंकांची सूट आहे. ते भारतीय शेअर बाजारासाठी चांगले संकेत नसल्याचे बोलले जात आहे. तसेच आशियायी बाजारातूनही चांगले संकेत मिळालेले नाहीत. अमेरिकेच्या शेअर बाजारातील घसरणीमुळे तेथील गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.

आशियाई बाजारात पडझड

वॉल स्ट्रीटवर झालेल्या नुकसानीमुळे आशियाई शेअर बाजारही गडगडला. जपनाचा निक्केई २२५१.७ टक्क्यांनी घसरला. तर टॉपिक्स १ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.२ टक्क्यांनी घसरला. कोस्डॅक १ टक्के घसरला. हाँगकाँगमधील हँग सेंग इंडेक्स फ्यूचर्सची चांगली सुरुवात झाली नाही.

अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजाराची पडझड, भारतावर काय परिणाम होणार?
Tea Shop Business : चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

अमेरिकेच्या शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली. डॉऊ जोन्स इंडस्टियल एवरेज २३४.२१ अंकांनी म्हणजे ०.६ टक्क्यांनी घसरून ३८,७६३ अंकावर बंद झाला. एसएंडपी ५००४०.५३ अंक म्हणजे ०.७७ टक्कयांनी घसरून ५,१९९.५ वर बंद झाला. नेडॅक्स कंपोजिटने १७१.०५ अंकांनी म्हणजे १.०५ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे १६,१९५.८१ वर बंद झाला.

अमेरिका ते जपानपर्यंत शेअर बाजाराची पडझड, भारतावर काय परिणाम होणार?
Small Business Ideas : फक्त विकेंडला करू शकता असे ७ व्यवसाय

आज सर्वांचं लक्ष भारतीय रिझर्व्ह बँकेवर असणार आहे. आरबीआय आज चलनविषयक धोरणाच्या घोषणेच्या शक्यतेमुळे बुधवारी पडझडीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ८७४ अंकांनी वधारून ७९,४६८.०१ वर बंद झाला. निफ्टी १.२७ अंकांनी वधारून २४,२९७.५० वर बंद झाला.

आज कोणते शेअर्स दिसणार तेजीत?

MACDने दिलेल्या माहितीनुसार, Cera Sanitaryware, Gokaldas Exports,Dr Lal PathLabs, KPR Mill आणि Embassy Office Parks या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर ने Inox Wind Energy, SBI Life, MRF, Page Industries, Shriram Finance आणि Shakti Pumps या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नोट - शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com