नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी ओपनिंगलाच जोरदार पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज शुक्रवारी सेन्सेक्ससहित निफ्टीही गडगडला. एनएसईचा निफ्टी २४,८०० अंकांवर बंद झाला. त्यानंतर सेन्सेक्समध्येही पडझड दिसून आली.
शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात सकाळी सेन्सेक्सचा व्यवहार ७०० अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. तर निफ्टीची २५० अंकाच्या घसरणीसह सुरुवात झाली. बँक निफ्टी ५१००० पर्यंत आला होता. मिडकॅप इंडेक्समध्येही ५०० अंकानी घसरला. स्मॉलकॅप इंडेक्सही १८५ अंकांनी घसरला. ऑटो आणि मेटलच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.
शेअर बाजारात सेन्सेक्स ८८५ अंकांनी घसरून ८०,९८१ वर बंद झाला. निफ्टी २१३ अंकांनी घसरून २४,७१७ वर बंद झाला. तर निफ्टी बँक २१३ अंकांनी घसरून ५१,३५० वर बंद झाला.
शेअर बाजार १-१ टक्क्यांच्या घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टी बंद झाला. निफ्टी हा २४,७०० अंकापर्यंत घसरला. सेन्सेक्सही ९०० अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
आज शेअर बाजारात आयटीसी, एचयूएल, अप्पोलो हॉस्पिटल, डॉ. रेड्डी, नेस्टल इंडिया कंपनीचे शेअर्स गेनर्स ठरले. तर टाटा मोटर्स , आयशर मोटर्स, टाटा स्टील, मारुती, एल अँड टी कंपनीचे शेअर्स घसरले.
आज शुक्रवारी सेन्सेक्स, निफ्टी व्यतिरिक्त बँक निफ्टी आणि अन्य सर्व इंडेक्सही रेड झोनमध्ये आहेत. अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारात त्याचा परिणाम पाहायला मिळाला. ग्लोबल मार्केटमध्ये घसरण ही मंदीच्या शंकेमुळे झाली आहे. अमेरिकेत मॅन्यूफॅक्चरिंग PMI मध्ये सर्वात अधिक घसरण पाहायला मिळाली. तसेच तिथे बेरोजगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.