नवी दिल्ली : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिलाली. बीएसईचा ३० शेअरवाला सेन्सेक्स ९९.५६ अंकानी उसळी घेऊन ०.१२ टक्क्यांनी आघाडी घेतली. त्यामुळे मंगळवारी सेन्सेक्स ८१,४५५.४० अंकावर बंद झाला. मंगळवारी सेन्सक्स व्यवहारादरम्यान एका वेळेला ४५९.४३ अंकानी म्हणजे ०.५६ अंकानी उसळी घेतली. त्यामुळे ८१,८१५.२७ अंकावर बंद झाल होता. मात्र, काही वेळाने खरेदी-विक्रीमुळे पु्हा घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील २१.२० अंक म्हणजे ०.०९ टक्क्यांनी आघाडी घेत २४,८५७.३० या विक्रमी अंकावर बंद झाला.
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली. तसेच एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड कॉरपोरेशन, टायटन, एशियन पेंट्स,इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि टाटा स्टीलचे शेअर्स फायद्यात होते. दुसरीकडे सन फार्मा, आयटीसी, हिंदुस्तान यूनिलीवर, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सीमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
मोमेंटम इंडिकेटर मूव्हिंग एवरेज कन्वर्जेंस डिव्हर्जेंस (MACD)ने Voltamp Transformers, AIA Engineering, Kaynes Technology India, Technocraft Industries आणि Mahanagar Gas या शेअर्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे. या शेअर्सच्या किंमतीमध्ये चढ-उतार देखील पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच यातून घसरणीचेही संकेत मिळत आहेत.
एमएसीडीने Britannia Industries, Alkem Laboratories, Castrol India, Heritage Foods, P&G Heath आणि Universal Cables या शेअर्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ या शेअर्समध्ये घसरण सुरु झाली आहे.
टीप - या शेअर्सची केवळ परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी शेअर मार्केट तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.