Stock Market Today : अबकी बार निफ्टी पोहोचला २५००० पार; सेन्सेक्सनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Stock Market Today's Update : शेअर बाजारात निफ्टी २५००० हजार पार पोहोचला आहे. तर सेन्सेक्सनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
 शेअर बाजार
Stock Market HighSaam Tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० बाजार उघडताच सकाळच्या व्यवहारादरम्यान २५००० पार पोहोचला आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर इंडेक्स सेन्सेक्सही ८२००० पार पोहोचला आहे. यामुळे सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाची शेअर बाजारात नोंद होणार आहे.

शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ३०४ अंकानी उसळी घेत ८२००० पार पोहोचला आहे. तर निफ्टीनेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. निफ्टीने १०८ अंकाची उसळी घेत २५००० पार पोहोचला आहे. तर सेन्सेक्सने ८२,१२९.४९ हा उच्चांकी स्तर गाठला आहे. तर निफ्टी २५,०७८.३० अंकाच्या उच्चांकी स्तरापर्यंत पोहोचला आहे.

 शेअर बाजार
Business Idea: फक्त 50,000 मध्ये सुरू करू शकता 'हे' 7 व्यवसाय, कमाई होईल शानदार

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० ला १००० अंकाची आघाडी घ्यायला २४ सत्र लागले आहेत. तर या २४ सत्रातील ट्रेडमध्ये २४००० अंकापासून २५००० अंकापर्यंत पोहोचला आहे. मागील दोन सत्रात निफ्टी २५००० अंकापर्यंत पोहोचला होता. अखेर गुरुवारी निफ्टी २५००० अंकाहून अधिक उसळी घेतली.

 शेअर बाजार
Business Idea: पावसाळ्यात फक्त ५ हजारांत बिझनेस करा सुरू; ४ महिन्यांत कमवाल पाण्यासारखा पैसा!

शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीचं कारण अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बुधवारच्या बैठकीचा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतेही बदल केले नाही. तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात व्याजदरात कपात होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

फेडर रिझर्व्हने सप्टेंबर महिन्यात व्याजदरात कपात केल्यास कोव्हिडनंतर म्हणजे ४ वर्षानंतर अमेरिकेत व्याजदरात कपात होणार आहे. याचा परिणाम अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीवरही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महागाईशी सामना करण्यासाठी मागील काही वर्षात फेडरल रिझर्व्हने सातत्याने व्याजदरात वाढ केली होती. या व्याजदराने मागील २३ वर्षातील उच्चांकी स्तर गाठला होता. व्याजदरात कपात होणार असल्याचे संकेत मिळाल्याने अमेरिकेच्या शेअर बाजारातील इंडेक्स एसएंडपी ५००० बुधवारी १.५ टक्क्यांनी वाढला. तर Nasdaq मध्येही ३ टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com