SEBI Report on Adani : हिंडनबर्गच्या अदानींवरील आरोपांमध्ये किती तथ्य? सेबीचा रिपोर्ट तयार, लवकरच सर्वोच्च न्यायालयात सादर करणार

Adani News : सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सेबीला 14 ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता.
Adani-Hindenburg row
Adani-Hindenburg rowsaam tv
Published On: 

Mumbai News : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांबाबत बाजार नियामक सेबीने आपला अंतिम अहवाल तयार केला आहे. सेबी आज हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवू शकते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी सेबीला 14 ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. आता या प्रकरणाची सुनावणी 29 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

Adani-Hindenburg row
Fixed Deposit Scheme: एफडीवर ही बँक देत आहे सर्वाधिक 9.10 टक्के व्याज, इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक...

सेबीने अहवालात काय?

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, बाजार नियामक सेबीची चौकशी संपल्यानंतर आता अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष आहे. हा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून हा तपास अहवाल नियामकाने तयार केला आहे.  (Latest Marathi News)

सेबीनी चौकशीत अदानी समूहाने किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (एमपीएस) नियमांमधील त्रुटींचा फायदा घेऊन कंपन्यांच्या शेअरच्या किमतींमध्ये फेरफार करणे, संबंधित व्यवहारांशी संबंधित खुलासे न करणे यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले.

Adani-Hindenburg row
Himachal Pradesh Cloudburst: हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! ढग फुटीमुळे ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेबीने न्यायालयाकडे 6 महिन्यांची मुदत मागितली होती. या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती की, हिंडेनबर्ग अहवालात नमूद केलेले 12 संशयास्पद व्यवहार सरळ सपाट नसून बरेच गुंतागुंतीचे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित व्यवहार जगातील अनेक देशांमध्ये असलेल्या कंपन्यांद्वारे केले जातात. (Finance News)

या सर्व 13 व्यवहारांशी संबंधित डेटा तपासण्यासाठी आणि निकाल तपासण्यासाठी बराच वेळ लागेल. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सेबीला 14 ऑगस्ट 2023 पर्यंत तपास पूर्ण करण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.