Fixed Deposit Scheme: एफडीवर ही बँक देत आहे सर्वाधिक 9.10 टक्के व्याज, इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक...

Fd Investment News: एफडीवर ही बँक देत आहे सर्वाधिक 9.10 टक्के व्याज, इतक्या दिवसांची करावी लागेल गुंतवणूक...
Fixed Deposit Scheme in ICICI
Fixed Deposit Scheme in ICICI saam tv
Published On

Fixed Deposit Scheme: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (SSFB) ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेव (FD) योजनेवरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

ज्येष्ठ नागरिक आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करून 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळवू शकतात. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.10 टक्के आणि सर्वसामान्यांना 4 टक्के ते 8.60 टक्के 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या एफडीवर ऑफर करत आहे.

Fixed Deposit Scheme in ICICI
Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 115 महिन्यांत पैसे होणार दुप्पट; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत एफडी

बँकेच्या वेबसाइटनुसार, हा व्याजदर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर उपलब्ध असेल. बँका आणि NBFC ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव योजना ऑफर करत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना आता 2 ते 3 वर्षात मॅच्युर होणाऱ्या एफडीवर 9.10 टक्के व्याज मिळेल. तसेच सामान्य ग्राहकांना या कालावधीतील ठेवींवर 8.6 टक्के दराने व्याज मिळेल. बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वृद्धांना 9 टक्के दराने व्याज देत आहे.  (Latest Marathi News)

एक वर्षापर्यंतच्या एफडीसाठी व्याजदर

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 15 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.75 टक्के व्याज देत आहे. 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.00 टक्के दराने व्याज दिले जाईल. 91 ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. बँक 6 महिने ते 9 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर 6.00 टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत आहे. 9 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज दिले जाईल. (Utility News in Marathi)

Fixed Deposit Scheme in ICICI
Kisan Vikas Patra: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 115 महिन्यांत पैसे होणार दुप्पट; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एका वर्षासाठी मुदत ठेवींवर 7.35 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडीवर 8.75 टक्के व्याज देईल. बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 9.00 टक्के दराने व्याज देत आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 9.10 टक्के दराने व्याज देईल. बँक 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देईल. बँक 5 वर्षांच्या एफडीवर 8.75 टक्के आणि 5 वर्षांवरील आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com