पोस्ट ऑफिस (Post Office) अनेक प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. यातील अनेक योजना लोकांमध्ये लोकप्रिय देखील आहेत. अशीच एक योजना आहे, ज्याचं नाव 'किसान विकास पत्र' योजना, असं आहे. यातच तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र या योजनेचा पर्याय म्हणून विचार करू शकतात.
पोस्ट ऑफिसची ही योजना पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण या योजनेत आता 120 महिन्यांऐवजी, गुंतवलेली रक्कम केवळ 115 महिन्यांत दुप्पट होते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकार सात टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक यात गुंतवणूक करत आहेत. (Utility News in Marathi)
किसान विकास पत्रातील गुंतवणूकीची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होईल. जानेवारी 2023 मध्ये सरकारने किसान विकास पत्राचा मॅच्युरिटीचा कालावधी 123 महिन्यांवरून 120 महिन्यांपर्यंत कमी केला. आता हा कालावधी आणखी कमी करून 115 महिने करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्रामध्ये गुंतवलेल्या रकमेवरील व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते. ज्यामुळे आधी परतावा मिळतो.
किसान विकास पत्र योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते. यातच एक प्रौढ व्यक्ती त्यांच्या वतीने खाते उघडू शकतो आणि अल्पवयीन 10 वर्षांचे झाल्यावर खाते त्यांच्या नावावर हस्तांतरित केले जाते. या योजनेसाठी खाते उघडणे खूप सोपे आहे.
यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.