Himachal Pradesh Cloudburst: हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! ढग फुटीमुळे ७ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

Himachal Pradesh Rain Updates: देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटीने हाहाकार उडाला आहे.
Himachal Pradesh Cloudburst
Himachal Pradesh CloudburstSaamtv
Published On: 

Himachal Weather Today: देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा ढगफुटीने हाहाकार उडाला आहे. राज्यातील सोलन येथील धायवाला गावात ढगफुटी झाली. सोलनचे डीसी मनमोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगफुटीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Himachal Pradesh Cloudburst
Onion-Garlic Price Hike : टोमॅटो स्वस्त तरीही दिलासा नाहीच, कांदा-लसून महागल्याने गृहिणींचं बजेड कोलमडणार, बघा नवे दर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटीच्याही घटना समोर आल्या आहेत. सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढग फुटून किमान सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

ढगफुटीमुळे दोन घरे आणि एक गोठा वाहून गेला. तसेच, सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढगफुटीच्या घटनेनंतर पाच जणांना वाचवण्यात आले, असे एसडीएम कंदाघाट, सिद्धार्थ आचार्य यांनी सांगितले. (३८), कमल किशोर (३५), हेमलता (३४), राहुल (१४), नेहा (१२), गोलू (८), रक्षा (१२) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.

Himachal Pradesh Cloudburst
Jaysingpur Crime News : फिल्मी स्टाइल अपहरणाने काेल्हापुरात 'सत्या'ची चर्चा, ज्वेलर्सच्या मालकसह पुतण्याचा शाेध सुरु

या दुर्घटनेनंतर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सोलनच्या जदोन गावात ढगफुटीमुळे सात जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. "या कठीण काळात पीडित कुटुंबांना सर्व शक्य मदत आणि समर्थन सुनिश्चित करण्याचे निर्देश आम्ही अधिकाऱ्यांना दिले आहेत," असे ट्वीट त्यांनी केले आहे.

शिमल्यातही मोठी दुर्घटना..

दरम्यान, शिमला शहरातही एक मोठी भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शिमल्यातील शिव बौड़ी मंदिर येथे हे भूस्खलन झालं असून, प्राथमिक स्तरावर ढिगाऱ्याखाली 35 ते 40 डण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाल्यची माहिती प्रशासनानं दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com