SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार

SBI Recruitment 2026: बँकेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआयमध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती होणार आहे. परीक्षा न देता नोकरी मिळवता येणार आहे.
SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार
SBI RecruitmentSaam Tv
Published On
  • SBI भरती २०२६ परीक्षा न देता बँकेत नोकरीची संधी

  • SBI ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी होणार भरती

  • SBI स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी मिळणार चांगला पगार

  • लेखी परीक्षा नाही तर मुलाखतीद्वारे होणार निवड

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती जारी केली आहे. ही पदे नियमित स्वरूपामध्ये भरली जाणार आहेत. या बँकेत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी नोंदणी २९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कशी प्रक्रिया असणार आहे आणि उमेदवारांनी कसा अर्ज करावा हे आपण पाहणार आहोत...

शिक्षण पात्रता किती असावी?

ट्रेड फायनान्स ऑफिसर (IBG) JMGS-I पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे किंवा IIBF कडून फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र ३१ जुलै, २०२६ रोजी किंवा त्यापूर्वीचे असावे. त्यांच्याकडे ICC अकादमीचे ग्लोबल ट्रेड प्रमाणपत्र/LIBF चे इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स (CITF) प्रमाणपत्र/IIBF चे इंटरनॅशनल ट्रेड प्रमाणपत्र आणि ट्रेड फायनान्स प्रोसेसिंग आणि ऑपरेशन्समध्ये किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर MMGS-II पदासाठी शैक्षणिक पात्रता समान आहे पण अनुभव ३ वर्षांपर्यंतचा असणे गरजेचा आहे.

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार
BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; तब्बल ५००० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

वयोमर्यादा किती?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर (जेएमजीएस-I) पदासाठी उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. एमएमजीएस II स्केलसाठी किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असावे. वयोमर्यादेची गणना ३१ जुलै, २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाणार आहे. नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये ३ ते १५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार
8th Pay Commission Recruitment : 8 व्या वेतन आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1.80 लाखांपर्यंत मानधन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

पगार किती असेल?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला असणार आहे. मूळ वेतनासोबतच उमेदवारांना महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर नुकसान भरपाई भत्ता (CCA), भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्तीवेतन निधी, राष्ट्रीय सार्वजनिक सेवा (NPS), रजा प्रवास सवलत (LFC), वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.

कनिष्ठ व्यवस्थापन श्रेणी वेतनश्रेणी-१: वेतनश्रेणी ४८४८० ते १८५९२० रुपये इतका असेल.

मध्यम व्यवस्थापन श्रेणी वेतनश्रेणी-२: वेतनश्रेणी ६४८२० ते १९३९६० रुपये इतका असेल.

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार
Teacher Recruitment : महाराष्ट्रात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती; उमेदवारांना करावी लागणार 'ही' एक गोष्ट

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. बँकेच्या शॉर्टलिस्टिंग समितीने यासाठी निकष निश्चित केले आहेत. या निकषांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीच्या फेरीसाठी निवड केली जाईल. त्यानंतर १०० गुणांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामध्ये निवड झालेल्यांना नोकरी मिळेल.

SBI Recruitment: बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, परीक्षाही होणार नाही, मिळेल ९३,००० पर्यंत मूळ पगार
Railway Job : तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, RPF मध्ये अप्रेंटिसच्या 734 जागांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com