

बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी
५००० पदांसाठी भरती जाहीर
अर्ज कसा अन् कुठे करावा?
बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदातील या अप्रेंटिसशिपअंतर्गत ५००० पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.
बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी (Bank Of Baroda Apprentice Recruitment)
बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.bankofbaroda.bank.in या वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२६ आहे.
बँक ऑफ बडोदामधील अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा भविष्यात करिअरमध्ये फायदा होणार आहे.
या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्टद्वारे होणार आहे. १०० गुणांची परीक्षा असणार आहे. यासाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना दर महिन्याला १५००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.
अर्ज कसा करावा? (BOB Recruitment Application Process)
या नोकरीसाठी अर्ज करताना बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे. काही महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करा.
फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.