

तुम्हाला सरकारी ऑफीसमध्ये काम करायचं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगात (8th Pay Commission) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अनुभवी व्यावसायिकांसाठी ही एक चांगली संधी आहे. तर तुम्ही इच्छूक असाल तर अर्जाची मुदत संपण्याआधी तुमचा ऑनलाइन अर्ज भरू शकता.
आयोगाकडून सीनियर कन्सल्टंट, कन्सल्टंट, आणि यंग प्रोफेशनल या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार सीनियर कन्सल्टंटसाठी जास्तीत जास्त ५ पदे असून अर्जदाराचं वय ४५ वर्षांपर्यंत आणि संबंधित क्षेत्रातले किमान १० वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. कन्सल्टंट पदासाठी ५ जागा असून वयोमर्यादा ४० वर्षे आणि ६ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी १० जागा उपलब्ध आहेत. तर त्यांचे वय हे ३२ वर्षांपर्यंत किमान ४ वर्षांचा अनुभव असणं गरजेचे आहे.
या पदांसाठी वित्त, मानव संसाधन, इंडस्ट्रीयल रिलेशन्स किंवा संबंधित विषयातले डिग्री झालेले किंवा MBA असणं आवश्यक आहे. तसेच LLB पदवीधारक आणि कायदेशीर संशोधनाचा अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. एक्सेल, स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन टूल्सचं ज्ञान सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.
मानधनाबद्दल बोलायचं झालं तर सीनियर कन्सल्टंटला पूर्णवेळ कामासाठी महिन्याला १.८० लाख रुपये, कन्सल्टंटला १.२० लाख रुपये, तर यंग प्रोफेशनलला ९० हजार रुपयांचं मानधन दिलं जाईल. याची निवड सुरुवातीला एका वर्षासाठी किंवा आयोगाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राहील. कामगिरी समाधानकारक असेल तर कराराचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. तुम्ही यासाठी आठव्या वेतनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्विकारले जाणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.