Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Sakshi Sunil Jadhav

पाण्याचे प्रमाण

शरीरात पुरेसे पाणी नसल्यास रक्ताचे प्रमाण कमी होते आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते.

High Blood Pressure

पाण्याचे प्रमाण

तज्ज्ञांच्या मते, दिवसातून किमान ६ ते ८ ग्लास पाणी पिणे शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही फायदा होतो.

Blood Pressure Control

डिहायड्रेशन टाळा

जास्त घाम येणे, जुलाब, उलट्या किंवा जास्त लघवीमुळे शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी डिहायड्रेशन होऊन रक्तदाब असंतुलित होऊ शकतो.

Blood Pressure Control

सोडियम आणि इलेक्ट्रोलाइट्स

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स स्नायू आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवतात. पुरेसे पाणी पिल्याने सोडियमचे संतुलन राखले जाते आणि रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते.

Blood Pressure Control

ब्लड प्रेशर

डिहायड्रेशनमुळे वाढलेला रक्तदाब योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने हळूहळू सामान्य होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलित राहतात.

Blood Pressure Control

पाण्याची गरज

वय, वजन, हवामान, शारीरिक हालचाल आणि गर्भधारणा यांसारख्या घटकांनुसार पाण्याची गरज बदलते. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पिणे आवश्यक आहे.

drink water | pinterest

बीटरूज्यूस

दररोज सुमारे २५० मि.ली. बीटरूटचा रस घेतल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यातील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करतात.

Beetroot | GOOGLE

टोमॅटो आणि डाळिंब

मीठ न घातलेला टोमॅटो रस आणि साखर नसलेला डाळिंबाचा रस नियमित प्रमाणात घेतल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

देसी टोमॅटो

लो-फॅट दूध

लो-फॅट दूधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात. हे घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Milk | pinterest

टीप

हा लेख सर्वसाधारण माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास किंवा आहार व औषधांमध्ये बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Hydration Benefits

NEXT : गहू, ज्वारी की बाजरी? 'या' १ पिठाची भाकरी आरोग्यासाठी आहे सर्वात नंबर वन

diabetic friendly roti
येथे क्लिक करा