Sakshi Sunil Jadhav
भारतीयांच्या आहारात भाकरी हा रोजच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग आहे. गव्हासोबत ज्वारी, बाजरी, मका आणि नाचणीच्या भाकऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात.
प्रत्येक धान्याचे वेगवेगळे पोषणमूल्य असल्याने आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणं महत्त्वाचं ठरतं.
गव्हाची भाकरी रोजच्या आहारात घेतल्याने तुम्हाला खूप पोषण मिळतं. त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि बरीच आवश्यक खनिजे असून पचन सुधारण्यासाठी आणि पोट जास्त वेळ भरलेलं ठेवण्यासाठी मदत होते.
मक्याच्या भाकरीत कार्बोहायड्रेट, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. त्याने शरीराला जास्तवेळ ऊर्जा मिळते. तसेच डोळ्यांसाठीही फायदा होतो.
ज्यांना ग्लूटेन टाळायचं आहे त्यांच्यासाठी ज्वारी हा उत्तम पर्याय आहे. ज्वारीतले फायबर आणि लोह पचन सुधारण्यास तसेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
बाजरीमध्ये प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे ती डायबेटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते.
नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि आवश्यक अमिनो ॲसिड भरपूर असतात. हाडे मजबूत ठेवणे, स्नायूंचे आरोग्य आणि वजन नियंत्रणासाठी ती फायदेशीर ठरू शकते.
दररोजच्या संतुलित आहारासाठी संपूर्ण गव्हाची भाकरी चांगली मानली जाते. पण दर आठवड्यात ज्वारी, बाजरी, मका आणि नाचणीचा समावेश केल्याने पोषण जास्त संतुलित मिळते.
ही माहिती उपलब्ध पोषणविषयक स्रोतांवर आधारित असून, कोणताही विशेष आजार किंवा वैद्यकीय समस्या असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.