SBI Data Leak Update: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! डेटा लीकच्या दाव्यावर बँकेचे स्पष्टीकरण; पैशांच्या सुरक्षेबाबत दिली महत्त्वाची माहिती

Cyber Security : SBIच्या काही ग्राहकांचा डेटा सायबर घटनेत प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे.
SBI Data Leak Update
SBI Data Leak Updatesaam tv
Published On: 

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांच्या डेटाशी संबंधित सायबर घटनेची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एसबीआयने ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेच्या माहितीनुसार, डेटा प्रभावित झालेल्या ग्राहकांना ई-मेल किंवा व्हॉट्सॲपच्या मदतीने याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्राहकांच्या खात्यातली शिल्लक आणि निधी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा बँकेने केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

एसबीआयच्या काही ग्राहकांचा डेटा सायबर घटनेत प्रभावित झाल्याची माहिती बँकेच्या नजरेत आलेली आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकांना ई-मेल किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण या घटनेत नेमक्या किती ग्राहकांचा डेटा प्रभावित झाला, कोणत्या प्रकारची माहिती समोर आली आणि ही घटना नेमकी कशी घडली, याची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची नेमकी माहिती समजण्यासाठी अधिकृत तपशील महत्त्वाचा ठरणार आहे.

SBI Data Leak Update
DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA वाढीची घोषणा कधी होणार? पुढच्या आठवड्यात काय घडणार?

ग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का?

डेटा लीकच्या वृत्तामुळे एसबीआयच्या ग्राहकांचं टेन्शन वाढलं होतं. पण बँकेने ग्राहकांच्या खात्यातले पैसे शिल्लक आणि निधी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केलेला आहे.

म्हणून ग्राहकांनी निष्काळजी राहू नका असंही बँकेने म्हटलं आहे. वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून फसवणुकीचे प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन, बँक खात्यातले पैसे नियमित तपासणं आणि संशयास्पद हालचालींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

SBI Data Leak Update
WhatsApp Update : ...तर तुमचंही Whatsapp होणार बंद, तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना? आताच जाणून घ्या

एसबीआयने ग्राहकांना काय सूचना दिल्या?

सायबर घटनेच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंग करताना सुरक्षित पद्धतींचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ग्राहकांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

१. OTP शेअर करू नका- बँकेच्या नावाने फोन करणाऱ्या व्यक्तीलाही ओटीपी सांगू नका.

२. PIN आणि पासवर्ड - एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा इतर महत्त्वाची माहिती कोणासोबतही शेअर करू नका.

३. संशयास्पद कॉलपासून सावध राहा - बँकेचा अधिकारी असल्याचं सांगून वैयक्तिक माहिती मागणाऱ्या व्यक्तीची खात्री करा.

४. ई-मेल आणि व्हॉट्सॲप संदेश तपासा - अनोळखी संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही लिंकवरून बँकिंगची गोपनीय माहिती देणे टाळा.

५. खात्यातील व्यवहारांवर लक्ष ठेवा - अनोळखी किंवा संशयास्पद व्यवहार दिसल्यावर लगेचच बँकेशी संपर्क साधा.

ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

एसबीआयच्या ग्राहकांनी बँकेकडून आलेल्या सूचनांची अधिकृत माध्यमातून खात्री करावी. डेटा लीकच्या नावाखाली फसवणूक करणारे बनावट फोन, ई-मेल आणि

व्हॉट्सॲप मेसेज पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे घाबरून कोणतीही कृती करू नये आणि कोणालाही बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com