WhatsApp Update : ...तर तुमचंही Whatsapp होणार बंद, तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना? आताच जाणून घ्या

SIM Binding : १ जानेवारी २०२७ पासून WhatsAppसह अनेक मेसेजिंग अ‍ॅपसाठी सिम बाइंडिंग नियम लागू हेण्याची माहिती आहे.
WhatsApp Update
WhatsApp Update saam tv
Published On: 

WhatsApp New Rules: सध्या WhatsApp हा सर्वांच्या आयुष्यातला दैनंदिन भाग झालाय. सकाळी उठताच १० सेकंदाच्या आत आपण WhatsApp चे मेसेज तपासतो. पण आता याच्या नियमात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. महत्त्वाची अपडेट म्हणजे, १ जानेवारी २०२७ पासून SIM Binding नियम लागू होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या नियमानुसार ज्या मोबाइल नंबरवरून WhatsApp किंवा इतर मेसेजिंग App वापरलं जातं, त्या नंबरचं सिम कार्ड संबंधित फोनमध्ये असणं आवश्यक असेल. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

SIM Binding नियम म्हणजे काय?

सध्या अनेकांना यूजर्स WhatsApp वर ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर संबंधित सिम कार्ड फोनमधून काढतात. त्यानंतरही वाय-फाय किंवा दुसऱ्या सिमच्या इंटरनेटच्या मदतीने WhatsApp वापरता येते. पण नव्या SIM Binding नियमानुसार, WhatsApp ज्या नंबरवर सुरू आहे, त्या नंबरचं सिम कार्ड फोनमध्ये असणं बंधनकारक असेल. हा नियम फक्त WhatsApp पुरता मर्यादित नसून टेलिग्राम, सिग्नल, ShareChat, JioChat आणि Arattai यांसारख्या मेसेजिंग Apps नाही लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

WhatsApp Update
PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार? 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

नियम लागू करण्यामागे सरकारचा उद्देश काय?

डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालणं हा या नियमामागचा प्रमुख उद्देश आहे. बऱ्याचदा सिम कार्ड एका फोनमध्ये असतं, तर त्याच नंबवरचे मेसेजिंग App दुसऱ्या डिव्हाइसवर वापरलं जातं. अशा परिस्थितीत संशयित डिव्हाइसचा मागोवा घेणं तपास यंत्रणांसाठी कठीण होऊ शकतं. SIM Binding मुळे मोबाइल नंबर आणि संबंधित डिव्हाइस यांच्यातला संबंध जास्त स्पष्ट ठेवायला मदत होईल.

WhatsApp Update
Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

WhatsApp Web वापरणाऱ्यांना दिलासा

सुरुवातीच्या निर्देशांमध्ये WhatsApp वेब सेशन दर सहा तासांनी आपोआप लॉगआउट करण्याची अट होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ही अनिवार्य अट मागे घेऊन त्याऐवजी जोखमीवर आधारित यंत्रणा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक यूजरला दर सहा तासांनी लॉगआउट व्हावं लागणार नाही. मात्र, फोनमध्ये संबंधित सिम असण्याची अट कायम राहणार आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com