Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Mercury Rise November 2026 : दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये बुध ग्रहाच्या उदयामुळे मिथून, मकर आणि कुंभ राशींना धनलाभ, करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
Lucky Zodiac Signs
Lucky Zodiac Signssaam tv
Published On: 

दिवाळीनंतर तीन राशी मालामाल होणार आहेत. कारण या दिवसांमध्ये ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाच्या उदयाची चर्चा असून, याचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा ज्योतिषांनी अंदाज व्यक्त केला आहे. बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता, संवाद, व्यापार आणि आर्थिक व्यवहाराशीं जोडला जातो.

त्यामुळे बुधाच्या उदयानंतर काही राशींच्या करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याची, व्यवसायात प्रगती होण्याची आणि आर्थिक नियोजनाला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मिथून, मकर आणि कुंभ या तीन राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. पण हा फक्त अंदाज असतो त्याला खरं मानून कामं करू नये. सकारात्मक राहावे.

Lucky Zodiac Signs
Fact Check : प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ८ लाख रुपये मिळणार, राज्य सरकारने सांगितले सत्य

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो, असा ज्योतिषीय अंदाज आहे. नोकरी करणाऱ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन ग्राहक जोडण्यासोबतच व्यवसायाच्या विस्तारासाठी नव्या योजना आखता येतील. मात्र, कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई करणे टाळावे. नव्या योजनांची व्यवहार्यता तपासूनच पुढे जाणे फायदेशीर ठरेल.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी चांगला संवाद ठेवल्याचा फायदा मिळू शकतो. जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण केल्यास कामातील प्रगतीचा मार्ग सुकर होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात उपयोगी ठरू शकतात. आर्थिक बाबतीत बजेट तयार करून खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील. तसेच घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याची संधी मिळण्याची शक्यता ज्योतिषीय अंदाजातून व्यक्त केली जात आहे. मात्र, मालमत्ता खरेदीपूर्वी आर्थिक क्षमता आणि कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

कुंभ राशी (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी योग्य पर्यायांचा शोध सुरू ठेवावा. अनुभव आणि कौशल्यानुसार चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन संपर्क निर्माण करण्यासोबतच रखडलेली कामे पूर्ण करण्यावर भर देता येईल. उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळू शकतात, असा ज्योतिषीय अंदाज आहे. मात्र, खर्च आणि बचत यांचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे ठरेल.

Lucky Zodiac Signs
Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महत्त्वाची सूचना: ग्रहस्थितीविषयीचे हे अंदाज ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. आर्थिक गुंतवणूक, नोकरी किंवा मालमत्ता खरेदीचे निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थिती आणि तज्ज्ञांचा सल्ला विचारात घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com