RBI UPI Rules: UPI पेमेंटसाठी RBI कडून ४ मोठे बदल, PhonePe अन् Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी वाचा

Digital Payments: RBIने UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. १०,००० पेक्षा जास्त व्यवहारांवर १ तास विलंब आणि किल स्विच सुविधा फसवणूक टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
RBI UPI Rules
RBI UPI Rulesgoogle
Published On

सध्या लोक डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार करणं पसंत करतात. आधी बॅंकेत जाऊन लांबच्या लांब रांगा लावून तुम्हाला पैसे काढता यायचे किंवा भरता यायचे. तसेच कॅशचाच वापर केला जायचा. पण आता एका स्कॅनमध्ये तुम्ही बॅंकेतले पैसे खर्च करु शकता. यासाठी कोणत्याच मोठ्या प्रोसेसमधून जावं लागत नाही.

आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank of India) ऑनलाइन पेमेंटमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. तुम्ही जर युपीआय, फोन पे, गुगल पे असे App वापरत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

RBI UPI Rules
EPFO Pension Rule: २ बायका असतील तर पेन्शन कोणाला मिळते? जाणून घ्या EPFO चा नियम

RBI ने गुगल पे आणि फोन पेचा वापर करणाऱ्यांसोबत कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून काही नियम लागू केले आहे. कारण एका चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तरी तुमचं खातं रिकामं होऊ शकतं किंवा फसव्या कॉलमुळे बॅंक खातं रिकामं होऊ शकतं.

RBIच्या नव्या नियमाप्रमाणे, तुम्ही आता १०, ००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करत असाल तर, ती लगेच समोरच्या खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला १ तास वाट पाहावी लागेल. तुम्हाला जर या वेळेत वाटलं की चुकीचा व्यवहार यामध्ये सुरु आहे. तर तुम्ही लगेचच थांबवू शकता. इतकंच नाही तर बॅंकेने ‘किल स्विच’ नावाची एक नवीन सुविधा आणली आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल हरवला किंवा हॅक झाला तर एका क्लिकमध्ये तुमच्या सगळे व्यवहार थांबवता येऊ शकतात. तुमच्या परवानगी शिवाय ते व्यवहार होऊ शकत नाहीत.

RBIच्या नियमात जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करताना जास्त पडताळणी करणं गरजेचं असेल.याने फसवणूक कमी होऊ शकते. हे नवे नियम लागू होण्यापूर्वी ८ मेपर्यंत नागरिकांना आपलं मत मांडण्याची संधी दिली आहे.

RBI UPI Rules
New Banking Rules: आता QR कोड स्कॅन करा अन् एटीएममधून पैसे काढा; या बँकेने सुरु केली सेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com