

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात आता कर्जदारांचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात देशातल्या किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. जर असं झालं तर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या EMI वर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये देशातल्या किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचलेला. RBI ने ठरवलेली महागाईची मर्यादा ६ टक्के आहे. म्हणजेच महागाईने ही मर्यादाही ओलांडली आहे. विशेष म्हणजे सलग नवव्या महिन्यात महागाईत वाढ नोंदवण्यात आली. तसेच खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चावरही मोठा परिणाम होताना दिसतोय. सप्टेंबरमध्ये ७.७४ टक्के असलेली खाद्य महागाई ऑक्टोबरमध्ये वाढून ८.९४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
Crisil च्या अर्थतज्ज्ञ दीप्ती देशपांडे यांच्या मते, RBI डिसेंबरच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते. काही अर्थतज्ज्ञांनी फेब्रुवारी २०२७ मध्येही व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली. Emkay Global च्या माधवी अरोरा यांच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२६ आणि फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्येकी ०.२५ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
रेपो रेट वाढल्यावर बँकांच्या कर्जावरचे व्याजदर वाढू शकतात. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचा EMI वाढू शकतो किंवा कर्जाचा कालावधी वाढू शकतो.पण प्रत्यक्ष परिणाम बँकेच्या व्याजदर धोरणावर आणि कर्जाच्या प्रकारावर अवलंबून असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.