RBI चा मोठा निर्णय! मुंबईतील ५२ वर्ष जुन्या बँकेचा परवाना केला रद्द; ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

RBI Cancel Sarvodaya Co-Operative Bank Licence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेला दणका दिला आहे. या बँकेचा परवाना रद्द केला आहे.
RBI
RBI Saam Tv
Published On
Summary

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

मुंबईतील ५२ वर्ष जुन्या बँकेवर कारवाई

सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एका ५२ वर्षीय जुन्या बँकेचा परवाना रद्द केला आहे. सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केली आहे.

RBI
महाराष्ट्रातील 2 बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई, पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढले

अपुरे भांडवल आणि नियमांच्या उल्लंघनामुळे आजपासून बँकेचे सर्व व्यवहार बंद झालेत.बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान 98 टक्के ठेवीदार सुरक्षित असून त्यांना 'डीआयसीजीसी' कायद्यांतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा परतावा मिळण्याची तरतूद आहे.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यांनुसार, या सहकारी बँकेने बँकिंग नियमन कायद्यातील तरतूदीचे पालन केले नाही. त्यामुळे या बँकेचे काम सुरु ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल. परवाना रद्द झाल्यानंतर बँकेला कोणतेही व्यव्हार करण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे.

ग्राहकांचे काय होणार?

सर्वोदय सहकारी बँक लिमिटेड सध्याच्या आर्थिक स्थितीत ठेवीदारांना पूर्ण रक्कम परत करु शकणार नाही. दरम्यान, ठेवीदार विमा आणि पत हमी महामंडळाच्या (DICGC) नियमांनुसार ५ लाखपर्यंतच्या ठेव विमा दाव्यासाठी पात्र ठरतील. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ९८.६ टक्के ठेवीदार डीआयसीजीकडून त्यांच्या ठेवींच्या पूर्ण रक्कमेसाठी पात्र आहेत.

RBI
RBI Rule Change : आरबीआयनं नियम बदलले, ऑटो-पेमेंटची ती अट कायमची बंद, वाचा सविस्तर

५२ वर्षापूर्वी सुरु केली होती बँक

सर्वादय सहकारी बँक ही २ वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती. ही बँक २४ ऑक्टोबर १९७४ रोजी सुरु केली होती. गुजराजतच्या मेहसाणा येथे दिवंगत मोतीलाल नागिंदास मानियार यांनी ही बँक सुरु केली होती.

RBI
महाराष्ट्रातील 2 बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई, पुसद अर्बन बँकेवरील निर्बंध वाढले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com