Scam Alert: तुमचं पार्सल येतंय! पोस्टाच्या नावानं मोबाइलवर मेसेज आलाय का? मग नक्की वाचा त्यामागचं गौडबंगाल!

Post Office Message Scam Alert: गेल्या काही दिवसात अनेकांना पोस्ट ऑफिसच्या नावाने मेसेज येत आहे. तुमचे पार्सल पोहचवायचे आहे परंतु अपूर्ण पत्त्यामुळे पार्सल पोहचवू शकत नाही, अशा आशयाचा हा मेसेज असतो. हा मेसेज फ्रॉड असून याद्वारे तुमची सर्व वैयक्तिम माहिती स्कॅमर्सला मिळते.
Post Office Scam Alert
Post Office Scam AlertSaam Tv
Published On

सध्या सर्व गोष्टी ऑनलाइन होतात. आपल्याकडे स्मार्टफोन असल्याने आपल्या प्रत्येक बँक व्यव्हारांची, पार्सलची माहिती लगेच आपल्याला मिळते. परंतु याच डिजिटल प्लॅटफॉर्मचा अनेक लोक दुरुपयोग करुन सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. असाच एक मेसेज सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत आहे. इंडियन पोस्ट ऑफिसच्या वतीने हा मेसेज येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हा मेसेज फ्रॉड आहे त्यामुळे तुम्ही हा मेसेजवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Post Office Scam Alert
ITR : आयटीआर दाखल केल्यानंतर किती दिवसांनी परतावा मिळतो? पैसे न आल्यास काय करावं?

पोस्ट ऑफिसच्या या बनावट मेसेजद्वारे युजर्सची पर्सनल माहिती मिळवली जाते. त्यानंतर त्याचा दुरुपयोग केला जातो. तसेच अनेकदा आर्थिक व्यव्हारांवरदेखील हे स्कॅमर्स लक्ष ठेवून असतात. पोस्ट ऑफिसच्या या मेसेजमध्ये लिहलं आहे की, तुमचे पार्सल गोदामात पोहचले आहे.आम्ही दोनवेळा तुमच्यापर्यंत पार्सल पोहचवण्याचा प्रयत्न केला परंतु तुमचा अपूर्ण पत्त असल्याने पार्सल पोहचवू शकलो नाही. कृपा करुन तुम्ही तुमचा पत्ता ४८ तासांच्या आता बदलून घ्या. नाहीतर तुमचे पार्सल पुन्हा पाठवण्यात येईल. यानंतर तुम्हाला एक लिंक दिली जाईल. या लिंकवर जाऊन तुम्ही पत्ता बदलू शकतात. असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. हा एक बनावट मेसेज आहे. त्यामुळे त्यावर क्लिक करु नका.

Post Office Scam Alert
Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

पोस्ट ऑफिसच्या नावाने येणारा हा मेसेज फ्रॉड आहे. या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती स्कॅम करणाऱ्या व्यक्तीकडे जाईल. त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. या मेसेजवर आलेल्या लिंकवर तुम्ही तुमच्या बँकेचे कोणतेही तपशील शेअर करु नका. अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होईल. कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून तुम्हाला मेसेज आल्यावर त्यावर क्लिक करु नका. तसेच कोणत्याही प्रकारचा ओटीपी अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नका.

Post Office Scam Alert
ITR: ITR भरल्यानंतर तुमच्या खात्यात परताव्याचे पैसे जमा झालेत की नाही? या सोप्या पद्धतीने करा चेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com