Relationship Tips : जोडीदाराला वारंवार मेसेज करणे पडू शकते महागात, क्षणार्धात तुटेल नात्याची दोर

Avoid Texting Your Partner Frequently : प्रेमाच नातं हे विश्वासावर टिकून असतं. त्यामुळे नाते जपताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचे जोडीदाराला वारंवार मेसेज करणे त्यांच्या स्वातंत्र्याला धक्का लावू शकते. यामुळे नाते तुटण्याचा धोका वाढतो.
Avoid Texting Your Partner Frequently
Relationship TipsSAAM TV
Published On

प्रेम म्हटलं की, भावनिक बंध आले. प्रेमात असताना काही लोक आपल्या जोडीदाराबाबत खूप भावनिक असतात. जोडीदाराने जास्तीत जास्त वेळ आपल्या सोबत घालवावा असे त्यांना वाटत राहते. या प्रेमा पोटी जोडीदार सोबत नसताना आपण त्यांना वारंवार मेसेज करतो. मात्र हे मेसेज तुमच्या नात्यासाठी वाईट संकेत ठरू शकतात.

जोडीदाराला वारंवार मेसेज करण्याचे दृष्परिणाम

  • तुम्ही जर जोडीदाराला वारंवार मेसेज करत असाल तर त्यांच्या व्यक्तीवर नियंत्रण आळा घालण्यासारखे होईल. त्यांचा वैयक्तिक वेळही त्याला देत नसल्यामुळे जोडीदाराची चिडचिड होईल. जोडीदाराने त्याची प्रत्येक अपडेट द्यावी हा अट्टाहास वेळीत सोडा. कारण तुमच्या नात्यासाठी हा घातक ठरू शकतो.

  • तुम्ही काळजी पोटी जर वारंवार मेसेज करत असल्यास ते त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. तुम्ही मेसेज करण्याला एक मर्यादा घातली पाहिजे. तुम्हा प्रमे आणि आठवण यामध्ये समतोल राखला पाहिजे.

  • जर तुमचा जोडीदार तुमच्या मेसेजला बराच वेळ प्रतिसाद देत नसेल. तर वारंवार मेसेज करणे थांबवा. कारण तुमचा जोडीदार कोणत्या तरी कामात असू शकतो. तो मेसेजला उत्तर देत नाही याचा अर्थ त्याच तुमच्यावर प्रेम नाही किंवा त्याला बोलायचे नाही असे होत नसतं.

  • प्रेमाचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्ही वारंवार जोडीदाराला मेसेज करत असाल तर त्यांची चिडचिड होऊ शकते. तसेच तुमचा विश्वास नाही असेही त्यांना वाटू शकते.

  • तुमच्या जोडीदाराला सतत मेसेज केल्याने त्याला रिलेशनशिपमध्ये अडकल्यासारखे वाटू शकते. आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.कारण इच्छा होते म्हणून वारंवार जोडीदाराला मेसेज केल्यास त्याला तुमचा कंटाळा येऊ शकतो.

Avoid Texting Your Partner Frequently
Couple Relationship : नात्यात 'ही' एक चूक ठरू शकते 'ब्रेकअप' चं कारण, वेळीच स्वतःला सावरा

जोडीदाराला मेसेज करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • तुमचे काही अत्यावश्यक किंवा प्रेमाच्या गप्पा मारण्यासाठी तुम्हाला जोडीदाराशी बोलायचे असल्यास मसेज करण्यापेक्षा डायरेक्ट कॉल करणे कधीपण चांगले राहील.

  • एखाद्या विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन जोडीदाराला मेसेज करावा.

  • एक-दोन मेसेज करून जोडीदार उत्तर देत नसेल. तर, थोडे थांबावे. पुन्हा वारंवार मेसेज करू नये.

  • मेसेजचे उत्तर न आल्यास त्याच्याशी फोनवर न बोलता कोणताही समज करून घेऊ नये. यामुळे नात्यांत दुरावा येऊन नाते तुटते.

Avoid Texting Your Partner Frequently
Parenting Tips : तुमची मुलं सतत उलट उत्तरं देतात? न रागावता करा 'ही' युक्ती, काही दिवसात होतील समजूतदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com