Relationship Tips : मला वेड लागले प्रेमाचे! प्रेम की फक्त मैत्री? ओळखा तुमची भावना

Couple Relationship : कोणत्याही प्रेमात मैत्री आवश्यक असते. मैत्रीमुळे प्रेमाचं नातं बहरत. पण हीच मैत्री नकळत एक पाऊल पुढे जाऊन प्रेमात रूपांतर होते. फक्त ही भावना ओळखणे काहींना कठीण जाते. चला तर मग जाणून घेऊयात प्रेम की फक्त मैत्री?
Couple Relationship
Relationship Tips SAAM TV
Published On

मैत्री आणि प्रेम या दोन्ही खूप सुंदर भावना आहेत. आपण आपल्या सर्व भावना आपल्या मित्रांसोबत सहज मनमोकळेपणाने शेअर करू शकतो. हीच मैत्री कधी कधी पुढे जाऊन प्रेमात रूपांतरीत होते आणि तुम्हाला कळतही नाही. प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. पण तुम्ही प्रेमात पडलाय हे ओळखायचे कसे आज जाणून घेऊयात. या भावना तुम्हाला तुमच्या नात्यांची स्पष्टता करून देतील.

ईर्षा

तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण दुसऱ्या कुणासोबत तरी जास्त वेळ घालवत असेल किंवा त्या व्यक्तीच्या जास्त जवळ जात असेल आणि याचा तुम्हाला त्रास होत असल्यास हळूहळू तुमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होत आहे.

आकर्षण वाढते

तुम्ही तुमच्या मित्रांचा किंवा मैत्रिणीचा वारंवार विचार करत असाल. तसेच त्यांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची मैत्री प्रेमाच रूप घेत आहे. हळूहळू तुम्ही त्यांच्याशी भावनिक रित्या खोलवर जोडले जात आहात.

आठवण येणे

सुख असो वा दुख कोणत्याही भावनेत तुम्हाला त्या व्यक्तीची सर्वात पहिली आठवण येत असल्यास तुम्ही नक्कीच प्रेमात पडला आहात. पूर्वी मित्राच्या मोठ्या गोष्टी दुर्लक्ष करणारे तुम्ही आता मात्र त्यांच्या छोट्याशा बोलण्याचाही खूप विचार करू लागतात.

मैत्री प्रेमाची पहिली पायरी

खरंतर काही वेळा मैत्री हीच प्रेमाची पहिली पायरी असते. मैत्रीत उलघडत जाणारा व्यक्त आयुष्यभर सोबत रहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रेमात आहात. तुम्ही त्याच्या चांगल्या-वाईट गुणांसोबत स्वीकारायला तयार असता म्हणजे तुम्ही प्रेमात आहात.

Couple Relationship
Parenting Tips : मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजेत; न विचारल्यास पालक म्हणून फेल ठराल

काल्पनिक जग

जर तुम्हाला तुमच्या मित्राचे नाव घेतल्यावर मनात गुदगुदल्या होत असतील किंवा तुमचा चेहरा आनंदाने बहरून जात असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचा प्रेमात आहात. तुम्ही जर तुमच्या मित्राच्या प्रेमात पडला असाल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांना अनुभवायला लागता. उदा. चित्रपटाचा एखादा प्रेम सीन. तुमच्या भविष्याची स्वप्ने त्यांच्या सोबत पाहू लागता.

सतत मित्राचा विचार

दिवसाची सुरुवात आणि शेवट जर तुमच्या मित्राचा विचार करत संपत असेल तर हे नाते मैत्रीच्या एक पाऊल पुढे गेले आहे. तुम्ही प्रत्येक क्षणी त्या एका व्यक्तीच्या विचारात हरवलेले असल्याचे पाहायला मिळते.

स्वतःवर लक्ष देणे

तुम्ही जर प्रेमात पडला असाल तर स्वतः वर विशेष लक्ष देऊ लागता. उदा. ज्या मित्राला भेटण्यासाठी तुम्ही घरच्या कपड्यांमध्ये जात असाल आता त्याच मित्राला भेटण्यासाठी तुम्ही सुंदर मेकअप आणि स्टायलिश कपडे घालत आहात. कारण प्रत्येकाला आपले प्रेम सुंदर दिसावे असे वाटत असते. तुम्ही स्वतः ला आरश्यात पाहून हसू आणि लाजू लागता.

Couple Relationship
Relationship Tips : पार्टनरसोबत नेहमीच खटके उडताय? मग ७ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या; नात्यात येईल गोडवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com