

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
पीएम किसान योजनेसाठी नवीन आयडी महत्वाचा आहे
पीएम किसानचा पुढील हप्ता जून - जुलै रोजी येण्याची शक्यता
केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत दिली मिळते. या योजनेत शेतकऱ्यांना ६००० रुपये वर्षाला दिले जातात. याचा हप्ता हा दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी याचे २२ हप्ते मिळाले आहेत. याचा २३ वा हप्ता हा जून - जुलै दरम्यान येण्याची शक्यता आहे.
तुम्ही पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण सरकारने पुढील हप्ता देण्याआधी तुम्हाला एक महत्वाची प्रोसेस करायला सांगितली आहे. तुम्हाला आता योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अॅग्री- स्टॅक आयडी अनिवार्य केलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे हे आयडी नाही किंवा ज्यांच्या जमिननिच्या नोंदींमध्ये चुका झालेल्या आहेत, त्यांना पुढील हप्ता दिला जाणार नाही अशी शक्यता आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५३,२३१ शेतकऱ्यांसाठी अॅग्री स्टॅक आयडी तयार करण्यात आलं आहे. तर काही शेतकऱ्यांची प्रक्रिया काही कारणांमुळे पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदी रेकॉर्ड झालेल्या नाहीत अशांना आता या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
शेतकऱ्यांना यूनिक फार्मर आयडी म्हणजेच अॅग्री स्टॅक आयडी हा कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे, असं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवलं आहे. हा नियम मोडणाऱ्यांना कोणताही लाभ दिला जाणार नाही. तसेच प्रत्येक जमीनमालकाला एक स्वतंत्र अॅग्री स्टॅक आयडी तयार करावा लागेल.
यासाठी जमिनीच्या नोंदी आणि अनेक महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. ॲग्री स्टॅकशिवाय, कोणताही नवीन शेतकरी मालक किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र राहणार नाही आणि त्यांना स्वतःचा स्वतंत्र आयडी तयार करावाच लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.