

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
बेसिक सॅलरी ६८,९४० पर्यंत वाढण्याची शक्यता
सध्या आठव्या वेतनाबाबतच्या चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. चर्चेत फिटमेंट फॅक्टर मागण्यांवर जास्त भर दिला जात आहे. कारण यावरूनच तुमच्या सध्याची बेसिक सॅलरी वाढ होईल आणि नवा बेसिक सॅलरिचा आकडा तुम्हाला कळेल. सरकार शेवटी जो फिटमेंट फॅक्टर ठरवेल त्यावरुन कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ठरणार आहे.
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ ठरवला होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ७००० रुपयांनी वाढवून १८,००० रुपये करण्यात आली होती. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती वाढेल? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती सरकारने दिलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, १.९२ फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. पण कर्मचारी संघटना यापेक्षा जास्त वाढीची मागणी करत आहेत. त्यासाठी विविध कर्मचारी संघटना, पेन्शन धारकांच्या संस्था वेगवेगळ्या मागण्या करत आहेत. यामध्ये नॅशनल कॉन्सिल जेसीएमच्या कर्मचारी विभागाने ३.८३ फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे नॅशनल पेन्शनर्स ऑर्गनायझेशनने ३.२५ फिटमेंट फॅक्टर ठेवण्याची मागणी केली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने ३.० फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील काही कर्मचारी संघटनांनी ३.८६ ते ३.६८ फिटमेंट फॅक्टर ठरवावा अशी मागणी केली आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलर ही १८ हजार रुपये आहे. जर १.९२ फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर ही सॅलरी ३४,५६० रुपयांपर्यंत जाऊ शकते. २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सॅलरीत ४६,२६० रुपयांपर्यंत वाढ होईल. ३.० फिटमेंट फॅक्टर लागू झाल्याने बेसिक सॅलरी ही 54 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तर ३.८३ फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीत ६८,९४० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.