8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार होणार ₹ 72,000 ? फिटमेंट फॅक्टरसंबंधी महत्वाची अपडेट

Fitment Factor Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. आता आठव्या वेतन आयोगाने कर्मचारी संघटनांकडून सूचना जारी करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे.
8th Pay Commission
8th Pay Commission Updategoogle
Published On

सध्या आठव्या वेतनाची सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या फिटमेंट फॅक्टरबाबत सरु असलेल्या चर्चेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी ठरू शकते. आठव्या वेतनात बेसिक सॅलरीत किती वाढ होणार? हे फिटमेंट फॅक्टरवर (Fitment Factor) )अवलंबून असतं. त्याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या सॅलरीला लागू केला जाणार गुणांक (Multiplier) असतो. याच्याच मदतीने नवीन वेतनाची वाढ ठरवली जाते. ७ व्या वेतना आयोगामध्ये २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू केला होता. तेव्हा बेसिक सॅलरी १८ हजार रुपयांवरून ४६,२६० रुपयांपर्यंत वाढली होती. आता आठव्या वेतन (8th Pay Commission) आयोगात हा फॅक्टर किती असावा यावर कर्मचारी संघटना चर्चा करत आहे.

8th Pay Commission
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत कोण आणि महिला किती अपात्र? वाचा संपूर्ण यादी

तज्ज्ञांच्या मते, सध्या महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या १० वर्षांत यामध्ये ५५ टक्क्यांनी महागाईत वाढ झाली असं ग्राहक किंमत निर्देशांक यांनी स्पष्ट केलं आहे. आता कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, २.५७ फिटमेंट फॅक्टर हा वाढत्या महागाईत पुरेसा नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी ३.० ते ४.० वाढवण्याच्या मागण्या केल्या आहेत.

विविध कर्मचारी संघटनांच्या मागण्या वाढल्या आहेत. त्यामध्ये भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS)४.० फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरीही ७२,००० रुपयांपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे NCJCM स्टाफ साइट आणि आणि AIDEF यांनी ३.८३३ फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव मांडला आहे.

त्यानुसार बेसिक सॅलरीही ६९,००० रुपयांपर्यंत वाढू शकते. महाराष्ट्र ओल्ड पेन्शन संघटनाने ३.८ फॅक्टरची मागणी केली आहे. तर FNPO आणि AITUC ने कमीत कमी ३.० फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. जर या मागण्या वाढल्या तर तुमच्या बेसिक सॅलरीत मोठी वाढ होऊ शकते.

8th Pay Commission
Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com