8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी! 8व्या वेतन आयोगात 'फिटमेंट फॅक्टर'मुळे पगार किती वाढणार? पाहा सविस्तर...

Central Government Employees Await Big Hike: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगात मोठी वाढ होणार आहे.
Central Government Employees Await Big Hike
8th Pay Commissiongoogle
Published On

मागील काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. ही वेतन वाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष पगार वाढीकडे आहे. पण ही पगारवाढ नेमकी किती असेल? असा सध्याचा प्रश्न आहे. पुढील माहितीत आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

मुळात फिटमेंट फॅक्टर हा महागाई भत्त्यावर अवलंबून असतो. जेव्हा महागाई वाढते तेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढतो. फिटमेंट फॅक्टर म्हणजे गुणक (Multiplier) असतो. त्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलेरीही नवीन सॅलरीमध्ये रुपांतरीत केली जाते. याचा फॉर्मूला तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला पगाराचा अंदाज बांधता येऊ शकतो.

Central Government Employees Await Big Hike
11th Admission 2026: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

फिटमेंट फॅक्टरचे सुत्र

नवीन बेसिक सॅलेरी (Fitment Factor) = मुळ वेतन (Existing Basic Pay) × फिटमेंट फॅक्टर (Revised Basic Pay​)

आता हे सुत्र कसं काम करतं हे समजून घ्या. फिटमेंट फॅक्टर जेव्हा वाढतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. पेन्शन, वेतनवाढ आणि थकबाकीमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजेत सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर होता. यामध्ये कमीत कमी बेसिक सॅलेरी ही ७,००० रुपयांपासून ते १८,००० रुपयांपर्यंत होती. म्हणजेच सुत्रानुसार ७,००० × २.५७ = १८००० असं हे गणित आहे.

सध्या आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर किती असेल हे समजलेले नाही. पण या सुत्रानुसार अंदाजे २.२८ ते ३.८३ फिटमेंट फॅक्टर असू शकतो. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Central Government Employees Await Big Hike
LPG New Rules: LPG आणि PNG वापरणाऱ्यांसाठी नवे नियम; 'या' चुका केल्यास गॅस सिलेंडर मिळणे होईल बंद, आताच जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com