PM Kisan Yojana: ९.३२ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज खात्यात जमा होणार ₹२००० ; त्याआधीच कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

PM Kisan Yojana 22nd Installment Come Today: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता आज जमा होणार आहे. दरम्यान, त्याआधीच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

आज खात्यात जमा होणार ₹२०००

त्याआधीच कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. आता आज १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. जवळपास ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट, ८ दिवसात खात्यात ₹२००० येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १३ मार्च रोजी आसामच्या गुवाहाटीमधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत. आसामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत.तिथेच एका कार्यक्रमात ते पैसे ट्रान्सफर करणार आहे. (PM Kisan Yojan 22nd Installment Update)

कृषी मंत्र्यांची माहिती (Agriculture Minister Shivraj Singh Chauhan Announcement)

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी असलेली वचनबद्धता दर्शवतो. २२वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर आतापर्यंत शेतकऱ्यांना हस्तांतरित केलेली रक्कम ४,२७कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. २०१९ मध्ये ही योजना सुरु केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ४.०९ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: खुशखबर! १३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

शेतकऱ्यांना मिळतात ६००० रुपये

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. कृषीमंत्र्यांनी सांगितले की, या हप्त्यामुळे २१.५ दशलक्ष महिला शेतकऱ्यांना मदत मिळेल. यातून बियाणे, खत, किटकनाशके अशा गोष्टी खरेदी करु शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com