Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Petrol Diesel Price Today 13th March: आज पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले आहेत ते जाणून घ्या. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत याचा परिणाम पेट्रोल डिझेलवर झाला आहे.
Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Rate TodaySaam Tv
Published On
Summary

आज पेट्रोलचे नवे दर जाहीर

पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की कमी झाले

वाचा तुमच्या शहरातील दर

सध्या आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जगावर पाहायला मिळत आहे. भारतात इंधनाची आयात होत नाहीये. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहे. याचसोबत एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. इंधन कमी झाल्याने पेट्रोल डिझेलचीही निर्मिती कमी झाली आहे. परिणाम हे दर वाढायला सुरुवात झाली आहे.

Petrol Diesel Rate Today
LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना चांगलाच फटका बसत आहे. याचसोबत पेट्रोल डिझेलदेखील संपेल की काय या भीतीने वाहनधारकांनी पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावल्या आहेत. आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या.

आज १३ मार्च २०२६ साठी भारतातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केलेल आहेत. कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे सध्या वाहनधारकांच्या मनात अनेक संभ्रम आहे. परंतु सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या दरावर फार परिणाम झालेला नाही. काही शहरात पेट्रोल डिझेलच्या दरात किंचिंत वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today
LPG Crisis: कुणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात 'रांगा'; जनता बेहाल

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर

नवी दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ८७.६२ रुपये प्रति लिटर

कोलकत्ता पेट्रोलचे दर १०३.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे भाव ९०.७६ रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोलचे दर १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९२.३४ रुपये

अहमदाबादमध्ये पेट्रोलचे दर ९४.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.१७ रुपये प्रति लिटर

बंगळुरुत पेट्रोलचे दर १०२.९२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८९.०२ रुपये प्रति लिटर

हैदराबादमध्ये पेट्रोलचे भाव १०७.४६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९.७० रुपये

Petrol Diesel Rate Today
Petrol-Disel Rate Hike: LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार, तेल कंपनीच्या 'त्या' निर्णयानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com