LPG Crisis: कुणी गॅस देता का गॅस? आखातात युद्ध, राज्यात 'रांगा'; जनता बेहाल

LPG Shortage : आखाती युद्धामळे देशासह राज्यातही गॅस तुटवडा निर्माण झालाय. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी लांब रांगा लावल्यात. राज्यात गॅसचा कसा भडका उडालाय ? आणि जनता कशी बेजार झालीय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
LPG Shortage :
long queues for LPG cylinders in Maharashtra due to gas shortagesaam tv
Published On

रायगडपासून कोल्हापूरपर्यंत आणि पुण्यापासून वाशिमपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात जनतेच्या गॅससाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. हा आहे ,इराण-इस्रायल य़ुद्धाचा सर्वसामान्यांवर झालेला थेट परिणाम. गॅसचा भडका उडालाय आणि जनता बेहाल झालीय. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात पहाटेपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

LPG Shortage :
देशभरातील पेट्रोल-डिझेल आणि LPGची टंचाई होणार दूर; केंद्र सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

दुसरीकडे ओटीपीची जाचक अट रद्द करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी कोल्हापूरकर करतायत. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही अशीच काहीशी परिस्थिती आहे. एकीकडे दिवसभर रांगा लावून जनता त्रासलीय. अशातच रत्नागिरीत घरगुती गॅसच्या बुकींगनंतर सर्व्हरमध्ये 2 सिलेंडरमधील अंतर 45 दिवसांचे दाखवण्यात येतेय.. या तांत्रिक बिघाडामुळे स्वयंपाकाच्या गॅससाठी नागरिकांची ओढाताण होतेय.

LPG Shortage :
LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

तर वाशिममध्ये सर्व्हर डाऊन असल्यानं गॅस नोंदणी प्रक्रियेचा बोजवारा उडालाय. दुसरीकडे गॅससाठी जनता वणवण करत असताना उपमुख्यमंत्र्यांनी मात्र गॅस पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं विधान केलंय. मात्र या सगळ्यात घरगुती गॅसमुळे आणि बुकिंगच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे गृहिणींचे बजेट आणि स्वयंपाकघर दोन्ही कोलमडलयं...हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com