New Tax Regime: २० लाखांचे उत्पन्न होऊ शकते टॅक्स फ्री; नवीन कर प्रणालीअंतर्गत ही प्रोसेस करा फॉलो

New Tax Regime Deduction: नवीन कर प्रणालीत करदात्यांना खूप सूट मिळते. यामध्ये तुम्ही टॅक्समध्ये सवलत मिळवू शकतात. २० लाखांच्या उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On
Summary

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी

२० लाखांच्या उत्पन्नावर कर होणार शून्य

नवीन कर प्रणालीत आयटीआर फाइल करताना या गोष्टी लक्षात ठेवा

करदात्यांसाठी थोड्याच दिवसात आयटीआर फॉर्म जारी केले जातील. यानंतर त्यांना आयटीआर भरायचा आहे. दरम्यान, करदाते टॅक्स वाचवण्यासाठी अनेक मार्ग निवडतात. दरम्यान, जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना जास्त टॅक्स द्यावा लागतो. २० लाखांचे उत्पन्न असलेल्या तरुणांना जवळपास १ लाख रुपयांना टॅक्स द्यावा लागतो. दरम्यान, तुम्ही आता २० लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स वाचवू शकतात. नवीन कर प्रणालीअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त कर वाचवू शकतात.

नवीन करप्रणालीत अनेक गोष्टींमुळे तुम्ही टॅक्स वाचवू शकतात. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न खूप कमी होऊ शकते. त्यामुळे आयटीआर फाइल करण्यापूर्वी हे काम कराच.

ITR Filling
Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

जुन्या कर प्रणालीत कलम 80C अंतर्गत गुंतवणूक करुन कर बचत केली जाते. नवीन कर प्रणालीअंतर्गत कर तुमच्या पगार रचनेवर अवलंबून असतो. तुम्ही किती गुंतवणूक करतात त्यापेक्षा जास्त तुमचा सीटीसी कसा आहे यावर कर ठरवला जातो.

जर तुमचा २० लाखांचा सीटीसी असेल तर त्यापेक्षा ५० टक्के म्हणजे १० लाख रुपये मूळ पगार असेल. त्यामध्ये अनेक भत्ते जोडले जाऊ शकतात.

कर कपात कशी करायची?

सर्वात आधी तुम्ही मील बेनिफिटचा विचार करा. जर तुम्ही प्रति मिल २०० रुपये गृहित धरले तर त्यानुसार २२ वर्किंग डेजचे जवळपास १.०५ लाख रुपये टॅक्स फ्री होतात. यानंतर EPF खात्यातील योगदान. तुमच्या बेसिक सॅलरीतील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करतात. यातील १.२ टक्के रक्कमेवर सूट मिळते. यानंतर कलम सेक्शन 80CCD(2)अंतर्गत एनपीएसमध्ये १.४ लाखांवर अतिरिक्त सूट मिळते. यामुळेही तुमचा कर वाचू शकतो.

सर्वात जास्त कर सूट कार लीजवर होते. जर कर्मचारी ८ लाखांच्या कारला दोन वर्षांसाठी लीजवर घेतो तर त्यावर वार्षिक खर्च ४.२३ लाख रुपये येतो. हा पगारात समाविष्ट होतो. हा कर कार्यक्षम अतिरिक्त होतो. यामुळे कर कपात होते. याचसोबत जर तुम्ही इंधन आणि चालकाच्या खर्चावरही दावा करु शकतो.

ITR Filling
Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

क्लिअरटॅक्सच्या माहितीनुसार, या सर्व कपातीनंतर तुमचे निव्वळ उत्पन्न १२.११ लाख होईल. त्यावर ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शन होईल. करपात्र उत्पन्न ११.३६ लाख असेल. नवीन कर प्रणालीत १२ लाखांपर्यंत कर सूट मिळते. त्यामुळे तुम्हाला कर भरावा लागणार नाही.

ITR Filling
ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com