ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? समोर आली मोठी अपडेट

Income Tax Return Filing 2026: आयटीआर फॉर्म कधीपासून भरता येणार असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. अजूनही पोर्टलवर फॉर्म दिसत नाहीये. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पोर्टलवर फॉर्म सुरु झाल्यानंतर तुम्ही आयटीआर फाइल करु शकतात.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On
Summary

आयटीआर कधीपासून फाइल करता येणार?

फॉर्म १ आणि फॉर्म ४ जारी

लवकरच पोर्टलवर दिसणार अपडेट

आयटीआर फाइल करण्याबाबत आयकर विभागाने नियम अधिक कडक केले आहेत. आर्थिक वर्ष ०२६-२७ साठी आयकर विभागाने आयटीआर फॉर्म १ आणि ४ अधिसूचित केले आहे. आयकर विभागाच्या पोर्टलवर सध्या मागच्या वर्षाचे फॉर्म दिसत आहे. जोपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म दिसत नाही तोपर्यंत तुम्ही आयटीआर फाइल करु शकत नाही.

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन आयटीआर फॉर्म जारी केले जातील. यानंतरच तुम्ही फॉर्म भरु शकतात. दरम्यान, जर कोणी बनावट कागदपत्रांचा वापर करुन कर चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.

ITR Filling
Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

याआधी रिटर्न फाइल केल्यानंतर सर्व गोष्टी चेक केल्या जायच्या. आता आरोग्य विमा, पीपीएफ, एनपीएस किंवा घरभाडे या सवलतींसाठी कागदपत्रे अपलोड करताच लगेच पडताळणी केली जाते. माहितीमध्ये जर कोणतीही तफावत आढळली तर ते दुरुस्त करण्यास सांगितले जाते. अन्यथा नोटीस पाठवली जाते.दंड आकारला जाईल.

कधीपासून करता येणार आयटीआर फाइल? (When Will ITR Filling Started)

आयटीआर फाइल कधीपासून करायचा असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. तुम्ही एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी आयकर परतावा भरणे आवश्यक आहे. उत्पन्नावरील कर भरण्यासाठी आयकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. दरम्यान, पोर्टलवर फक्त मागील वर्षाचे फॉर्म दिसत आहे. जोपर्यंत २०२६-२७ साठीचे आयटीआरचा पर्याय दिसत नाही तोपर्यंत तुम्ही कायदेशीररित्या रिटर्न फाइल करु शकत नाही. त्यामुळे आता करदात्यांना वाट पाहावी लागणार आहे.

ITR Filling
ITR दाखल करण्याची झंझट संपली; कर भरण्याचे नियम बदलणार; नवीन काय आहे अपडेट जाणून घ्या

मागील वर्षी आयटीआर फॉर्म जारी करण्यासाठी उशिर झाला होता. त्यामुळे आयटीआर भरण्याची मुदतदेखील सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. दरम्यान, या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाइल करण्याची सुरुवात कधीपासून सुरु होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर आयटीआर फॉर्म सुरु होण्यास अजून काही दिवस उशिर झाला तर मुदतवाढ मिळणार का असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

ITR Filling
ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com