New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू; पगारापासून ते PF वर होणार परिणाम; वाचा सविस्तर

New Labour Code Impact: नवीन कामगार कायदा लागू करण्यात आला आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, ग्रॅच्युटी याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
New Labour Code
New Labour CodeSaam Tv
Published On
Summary

नवीन कामगार कायदा लागू

कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार परिणाम

अनेक गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल

सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. नवीन कामगार कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नवीन कामगार कायद्यामुळे अनेक महत्त्वाचे बदल होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमांमुळे सॅलरी स्टॅक्टर, वर्कप्लेसची प्रक्रिया आणि कंप्लायन्स सिस्टीममध्ये बदल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नवीन कामगार कायद्याची घोषणा केली. यातील ४ कामगार संहिता लागू केल्या आहेत. या कायद्याने जुन्या २९ कामगार कायद्याची जागा घेतली आहे. यामध्ये वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, कामाशी संबंधित सुरक्षा यांचा समावेश आहे.

New Labour Code
New Labour Law: ३० लाखांचा CTC असेल तर इन हँड सॅलरी किती होणार? एप्रिलपासून किती कमी पगार येणार? वाचा सविस्तर

वेतनात काय बदल होणार?

ईवाय इंडियाच्या पीपल अॅडव्हायझरी सर्व्हिसेसच्या टॅक्स विभागाने भागीदार पुनीत गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, हे कायदे प्रामुख्याने त्या क्षेत्रांना लागू होतील जिथे केंद्र सरकारचा प्रभाव आहे. म्हणजेच बँक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, हवाई वाहतूक, प्रमुख बंदरे या ठिकाणी लागू होतील.

New Labour Code
New Labour Law: पगारात घट होणार? नव्या नियमांचा ग्राहकांना दणका बसणार; १ मेपासून बँकेचे कोणते नियम बदलणार?

या नियमांमळे किमान वेतन, कामाचे तास आणि पगाराबाबत अधिक स्पष्टता आली आहे. नवीन कामगार कायद्यात कामाचे तास प्रत्येक आठवड्याला ४८ कास केले आहे.तसेच दंड, आगाऊ रक्कम, नुकसान या कपातींसाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागणार आहे. कर्मचारी नोंदवही, पगाराची नोंद, हजेरीची नोंदवही यासाठीही नियम तयार करण्यात आले आहे. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.

New Labour Code
New Labour Code: ४ दिवस काम, ३ दिवस सुट्ट्या; नवीन कामगार कायद्याचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com