

येत्या १ मेपासून महाराष्ट्रात नवीन कामगार संहिता लागू होणार आहे. कामगार संहितेचा कामगारांवर परिणाम होणार आहे. यात काही महत्वाचे बदल केले जाणार आहेत. सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे तुमची बेसिक सॅलरी (CTC)च्या ५० टक्के इतकी असेल. तर तुमचा पीएफ जास्त कापला जाईल.
याने तुम्हाला भविष्यात फायदा होईल पण हातात कमी पगार येईल. तर कामाच्या ठिकाणी तुम्ही १५ मिनिटे जास्त काम केलं तरीही तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. यात ओव्हरटाइमचे डबल पैसे मिळतील. हाच नियम Zomato आणि Swiggy डिलीवरी पार्टनर्सना सुद्धा लागू होतो.
नवीन कामगार संहितेत(New Labour Code) १ मेपासून दैनंदिन वापरातल्या ATMचे नियमही बदलले आहेत. त्यामध्ये ट्रान्झॅक्शनची मुदत कमी केली आहे. म्हणजे तुम्ही जर महिन्याच्या लिमीटपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला त्याचा चार्ज किंवा शुल्क भरावे लागेल.
तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्या कामासाठी वापरले जात आहेत? तसेच त्याच किती रिस्क असेल याची माहिती मिळेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना सेफ गुंतवणूकीचा पर्याय निवडणं सोपं होईल.
जर तुम्ही १ मेच्या आधी e-kyc अपडेट केली नाही तर तुमचं खातं फ्रीज करण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला बॅंकेशी संबंधीत कोणतेच व्यवहार करता येणार नाहीत.
तुम्हाला आता UPI पेमेंट करताना तुमच्या अंगठ्याने स्कॅन करणं महत्वाचं ठरेल. यात Two-Factor Authentication करणं आवश्यक राहील. याने फॉड होण्यापासून तुम्ही वाचू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.