Sakshi Sunil Jadhav
सध्या उष्माघात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचा जीवही गमवावा लागत आहे.
सध्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? याबद्दल आपण जाणून घेणं महत्वाचं आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या एका व्हिडीओत उष्माघातावर एक उपाय सापडला आहे.
जुन्या पारंपारिक उपायानुसार उन्हाळ्याच्या दिवसात खिशात कांदा घेऊन फिरल्याने उष्माघाताचा त्रास कमी होतो.
अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की, उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी खरंच कांद्याचा उपयोग फायदेशीर ठरतो का? चला जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवल्याने सुर्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ही एक पारंपारिक पद्धत आहे. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
जेव्हा उन्हाचं तापमान वाढतं तेव्हा आपल्याला खूप घाम येतोच. मग तुम्ही खिशात कांदा ठेवलात तरी त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.