New Labour Law: ३० लाखांचा CTC असेल तर इन हँड सॅलरी किती होणार? एप्रिलपासून किती कमी पगार येणार? वाचा सविस्तर

New Salary Rules 2026: नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. नवीन कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांची इन हँड सॅलरी कमी होणार आहे. एप्रिल महिन्यात त्यांना कमी पगार मिळणार आहे.
New Labour Law
New Labour LawSaam tv
Published On
Summary

१ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू

वेतन रचनेत बदल

३० लाख सीटीसीवर पगार किती येणार?

१ एप्रिल २०२६ पासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. एप्रिल महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांना कमी पगार येणार आहे. नवीन कामगार कायद्या वेतन रचनेत बदल झाला आहे. याचा थेट परिणाम तुमच्या इन हँड सॅलरीवर होणार आहे. सरकारने बेसिक सॅलरीबाबतचे नियम बदलले आहेत.

New Labour Law
EPFO Rules: नोकरी गेली तरी PF वर व्याज मिळते? वाचा नियम काय सांगतो

आता या नवीन नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही सीटीसीच्या ५० टक्के असणे गरजेचे आहे. अनेक कंपन्यांना याआधी कर्मचाऱ्यांची बेसिक स्रलरी कमी ठेवायचे. याउलट भत्ता, अलाउंसमध्ये जास्त पैसे द्यायचे. परंतु आता असं काहीही होणार नाही. आता ५० टक्के बेसिक सॅलरी असणे आवश्यक आहे. तुमची बेसिक सॅलरी जेवढी जास्त असेल तेवढे तुमचे ईपीएफओमध्ये जास्त पैसे जमा केले जाणार आहेत. यामुळे रिटायरमेंटनंतर मिळणार फंड जास्त असेल.

३० लाख CTC असेल तर किती पगार मिळणार?

जर तुमचा सीटीसी (CTC) ३० लाख असेल तर त्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. त्यांची बेसिक सॅलरी कमीत कमी १५ लाख असणे गरजेचे आहे. तुमची बेसिक सॅलरी ६९,४४४ रुपयांवरुन वाढून १,०४,१६७ रुपये होणार आहे. दरम्यान, स्पेशल अलाउंसमध्ये घट होणार आहे.

या नवीन कामगार कायद्यामुळे ईपीएफमधील कपात ८,३३३ रुपयांवरुन १२,५०० रुपये होणार आहे. तुम्ही पीएफ खात्यात जवळपास ४,१६७ हजार रुपये जास्त जमा करणार आहात. यामुळे तुमची इन हँड सॅलरी मात्र कमी होणार आहे. तुमची इन हँड सॅलरी १,९१,४६७ रुपयांवरुन १,८७,३०० रुपये होणार आहे. म्हणजेच तुम्हाला ४,१६७ हजार रुपये कमी मिळणार आहेत. १० लाखांच्या सीटीसीवर ही कपाक ८०० ते १२०० रुपयांपर्यंत होऊ शकते.

New Labour Law
New Labour Law: आता ५ वर्षे वाट पाहावी लागणार नाही; कर्मचाऱ्यांना वर्षभरात मिळणार ग्रॅच्युटी; वाचा नवीन नियम

फायदा होणार की नुकसान?

नवीन कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांची इन हँड सॅलरी कमी होणार आहे. परंतु भविष्यासाठी हा नियम फायद्याचा ठरणार आहे. तुमचा पीएफ जास्त जमा झाला तर रिटायरमेंटचा फंड जास्त जमा होणार आहे.

New Labour Law
New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com