50MP कॅमेरा अन् जबरदस्त फीचरसह Moto G Stylus 5G लाँच; जाणून घ्या किंमत

Moto G Stylus 5G Price: मोटोरोला ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच Moto G Stylus 5G (2024) लाँच केला आहे.
Moto G Stylus 5G
Moto G Stylus 5GSaam Tv

मोटोरोला (Motorola) ही भारतातील प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच Moto G Stylus 5G (2024) लाँच केला आहे. कंपनीने हा आपला स्मार्टफोन अमेरिकेत लाँच केला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

Moto G Stylus 5G हा स्मार्टफोन Samsung Galaxy S24 Ultra स्टाईलसह येतो. हा फोन G सीरीजचा एक भाग आहे. Moto G Stylus 5G फोन व्हेगन लेदर फिनिश आणि इन-बिल्ट स्टाइलसह येतो. यामध्ये तुम्ही Stylus च्या मदतीने नोट्स लिहू शकतात. डूडल्स बनवू शकतात.

स्मार्टफोनची किंमत

Moto G Stylus 5G स्मार्टफोनची किंमत अमेरिकेत 339.99 डॉलर रुपये आहे. म्हणजेच भारतीय रुपयांनुसार ३३,४०० रुपये आहे. हा स्मार्टफोन कॅरेमल लॅटे आणि स्कार्लेट वेव या दोन रंगामध्ये लाँच झाला आहे.

Moto G Stylus 5G फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ poOLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची स्क्रिन 120Hz रिफ्रेश रेट, 2.50D ग्लास आणि 1200 Nits च्या पीक ब्राइटनेससह येते. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Moto G Stylus 5G
Gold Silver Price Hike : सोन्याचे दर सत्तरी पार; वाचा आज मुंबई पुण्यातील किंमती

हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन Android 14 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि डॉल्बी ऑटोमास फीचर देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Moto G Stylus 5G
Petrol Diesel Price Today (११ मे 2024) : पेट्रोल-डिझेलचे नवे दर झाले जाहीर ? पाहा तुमच्या शहरासह देशाच्या महानगरांमधील अपडेट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com